✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *गणित - दिनदर्शिका महत्त्वाचे दिवस*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
१) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
१) १४ एप्रिल
२) १ मे
३) ५ जून
४) २६ जून
२) शाहू महाराज जयंती कोणत्या तारखेला असते?
१) २६ जून
२) १९ फेब्रुवारी
३) ५ सप्टेंबर
४) २७ फेब्रुवारी
३) एका सामान्य वर्षात किती दिवस असतात?
१) ३६६
२) ३६४
३) ३६५
४) ३६७
४) लीप वर्षा बाबत खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता ?
१) ५२ आठवडे व १ दिवस
२) ५२ आठवडे व २ दिवस
३) ३६६ दिवस
४) २९ फेब्रुवारी
५) खालीलपैकी कोणत्या दिवशी “मराठी भाषा दिन” साजरा केला जातो?
१) २७ फेब्रुवारी
२) २८ फेब्रुवारी
३) १९ फेब्रुवारी
४) ३ जानेवारी
६) “राष्ट्रीय विज्ञान दिन” कधी असतो?
१) २३ जानेवारी
२) ८ मार्च
३) २८ फेब्रुवारी
४) १४ एप्रिल
७) वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
१) १५ ऑक्टोबर
२) १४ नोव्हेंबर
३) ८ सप्टेंबर
४) १ जुलै
८) खालीलपैकी कोणता दिवस ऑक्टोबर महिन्यात येतो?
१) क्रांतिदिन
२) शिक्षक दिन
३) महात्मा गांधी जयंती
४) कृषी दिन
९) “सावित्रीबाई फुले जयंती” कधी असते?
१) ६ जानेवारी
२) ३ जानेवारी
३) १२ जानेवारी
४) १९ फेब्रुवारी
१०) नाताळ सण कोणत्या तारखेला साजरा केला
जातो?
१) १४ नोव्हेंबर
२) ६ डिसेंबर
३) २५ डिसेंबर
४) १ जानेवारी

No comments:
Post a Comment