Thursday, 2 October 2025

बुद्धिमत्ता - दिनदर्शिका


✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - दिनदर्शिका*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) जर १ जानेवारी २०२४ रोजी सोमवार असेल तर ३१ डिसेंबर २०२४ कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) रविवार

४) बुधवार


प्रश्न २) १ जानेवारी २०१८ ला सोमवार असेल तर १ जानेवारी २०१९ ला कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) बुधवार

४) गुरुवार


प्रश्न ३) जर १५ ऑगस्ट २०२१ रोजी रविवार असेल तर २ ऑक्टोबर २०२१ कोणता वार असेल?

१) शनिवार

२) रविवार

३) शुक्रवार

४) सोमवार


प्रश्न ४) एका महिन्यात ३१ दिवस आहेत आणि त्या महिन्याचा पहिला दिवस मंगळवार आहे. तर त्या महिन्याचा शेवट कोणत्या दिवशी होईल?

१) गुरुवार

२) शुक्रवार

३) बुधवार

४) शनिवार


प्रश्न ५) २६ जानेवारी २०२२ रोजी बुधवार होता. तर १५ ऑगस्ट २०२२ ला कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) बुधवार

४) गुरुवार


प्रश्न ६) जर १ मार्च २०१९ रोजी शुक्रवार असेल तर १ मार्च २०२० रोजी कोणता वार असेल?

१) शनिवार

२) रविवार

३) सोमवार

४) शुक्रवार


प्रश्न ७) खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे?

अ) प्रत्येक लीप वर्षात ३६६ दिवस असतात.

ब) ३१ दिवसांचे महिने आठ असतात.

क) प्रत्येक शतकातील पहिले वर्ष नेहमी लीप वर्ष असते.

ड) फेब्रुवारी महिन्यात कधी २८ तर कधी २९ दिवस असतात.

१) फक्त ‘अ’

२) ‘अ’ व ‘ड’

३) ‘ब’ व ‘क’

४) ‘अ’ व ‘ब’


प्रश्न ८) एका महिन्यात ३० दिवस असून त्याचा पहिला दिवस गुरुवार असेल तर त्या महिन्यात किती रविवार येतील?

१) चार

२) पाच

३) तीन

४) सहा


प्रश्न ९) २०२५ मध्ये १ जानेवारी बुधवार असेल तर २६ जानेवारी २०२५ कोणता वार असेल?

१) रविवार

२) सोमवार

३) शनिवार

४) मंगळवार


प्रश्न १०) चुकीचे विधान ओळखा.

अ) प्रत्येक वर्षी ५२ आठवडे असतात.

ब) सर्व महिन्यांत किमान ३० दिवस असतात.

क) लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात.

ड) २००० हे वर्ष लीप वर्ष होते.

१) फक्त ‘ब’

२) ‘अ’ व ‘ड’

३) फक्त ‘क’

४) ‘ब’ व ‘क’

दिनदर्शिका यावर आधारित शैक्षणिक खेळ खेळण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment