Wednesday, 12 November 2025

गणित - पाच अंकी संख्यांचे वाचन लेखन

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - पाच अंकी संख्यांचे वाचन लेखन*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) सर्वांत लहान पाच अंकी संख्या कोणती ?

(१) १०००० 

(२) १००० 

(३) ९९९९९ 

(४) ९९९९


२) सर्वांत मोठ्या पाच अंकी संख्येनंतरची क्रमिक संख्या कोणती ?

(१) ९९,९९९ 

(२) १,००,००१ 

(३) १,००,००० 

(४) ९९,९९८


३) एका संख्येत ४ दशहजार, ३ हजार आणि ५ दशक आहेत. ती संख्या कोणती ?

(१) ४०३०५ 

(२) ४०३५० 

(३) ४००३५ 

(४) ४३०५०


४) ८५७२ या संख्येला १००० ने वाढवल्यास नवीन संख्या किती होईल ?

(१) १८५७२ 

(२) ९५५७२ 

(३) ८५७२ 

(४) ९५७२


५) ५० हजारांपेक्षा ५६० ने जास्त असलेली संख्या कोणती ?

(१) ५०६०० 

(२) ५०५६० 

(३) ५००५६ 

(४) ५६०५०


६) “छप्पन हजार सहाशे वीस” ही संख्या अंकात लिहा.

(१) ५०६२० 

(२) ५६०६२ 

(३) ५६६२० 

(४) ५६०६२०


७) ४९९९९ नंतरची क्रमिक संख्या कोणती ?

(१) ४९९९० 

(२) ५०००० 

(३) ५९९९९ 

(४) ४९०००


८) १०००० मध्ये ८७६ जोडल्यास उत्तर किती ?

(१) ११८७६ 

(२) १७८६० 

(३) १०८७६ 

(४) १८७६


९) पाच अंकी सर्वांत मोठी संख्या कोणती ?

(१) ९९९९९ 

(२) १०००० 

(३) ९०९०९ 

(४) ९९९९


१०) “एकवीस हजार एकशे अकरा” ही संख्या अंकात लिहा.

(१) २०१११ 

(२) २१०१११ 

(३) २११११ 

(४) २१०११


No comments:

Post a Comment