✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *कविता व त्यावरील प्रश्न*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
खालील कविता वाचा अचूक पर्याय निवडून त्याचे वर्तुळ रंगवा.
कविता
मोरा रे मोरा
काय तुझा तोरा !
रंगीत पिसारा
डोक्यावर तुरा !
वर बघ वर
काळे काळे ढग
एक पाय दुमडून
पिसारा फुलवून
नाच तर खरा
मोरा रे मोरा !
प्र.१) मोर कसा नाचतो?
१) उडी मारून
२) पिसारा फुलवून
३) पळत
४) बसून
प्र.२) कवितेत ढगांचा रंग कोणता दिला आहे?
१) पांढरा
२) काळा
३) निळा
४) राखाडी
प्र.३) मोराने काय फुलवले आहे?
१) पंख
२) पिसारा
३) शेपटी
४) फुले
प्र. ४) कवितेत मोराच्या डोक्यावर काय आहे?
१) मुकुट
२) तुरा
३) टोपी
४) काडी
प्र.५) कवितेत "वर बघ वर" असे का म्हटले आहे?
१) पक्षी दिसतात म्हणून
२) सूर्य दिसतो म्हणून
३) काळे ढग आले म्हणून
४) तारे दिसतात म्हणून

No comments:
Post a Comment