Thursday, 27 November 2025

इयत्ता दुसरी: मराठी - शब्दांच्या जाती - विशेषण

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *शब्दाच्या जाती (विशेषण)*

****************************

प्र.१) खालील वाक्यातील विशेषण ओळखा आणि योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

मोठ्या झाडाखाली थंड हवा वाहत होती.

१) झाडाखाली

२) थंड

३) हवा

४) वाहत


प्र.२) खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द निवडा.

१) गोड

२) निळा

३) फुल

४) हिरवा


प्र.३) खालील वाक्यात किती विशेषणे आहेत?

छोट्या पाखराने सुंदर गाणे म्हटले.

१) एक

२) दोन

३) तीन

४) काहीही नाही


प्र.४) दिलेल्या पर्यायांतील विशेषण शोधा.


१) बसला

२) जलद

३) पळत

४) रडला


प्र.५) रिकाम्या जागी योग्य विशेषण भरा.

रामूने ____ पतंग आकाशात सोडला.

१) पिवळा

२) वर

३) घेऊन

४) सोडला

No comments:

Post a Comment