Wednesday, 26 November 2025

इयत्ता दुसरी: मराठी - शब्दांच्या जाती : सर्वनाम

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *शब्दाच्या जाती (सर्वनाम)*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आणि योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

सोनाली म्हणाली की तिने सर्व काम पूर्ण केले.

१) तिने

२) सोनाली

३) सर्व

४) काम


२) दिलेल्या पर्यायांतून सर्वनाम असलेला शब्द निवडा.

१) धावत

२) खेळ

३) आम्ही

४) घर


३) रिकाम्या जागी योग्य सर्वनाम भरा.

राम व श्याम दोघेही आले होते. _____ एकत्र जेवण केले. 

१) त्यांनी

२) त्याला

३) तिला

४) तुम्ही


४) खालील वाक्यात सर्वनाम शोधा.

शीला रडत होती म्हणून, तिच्या आईने तिला समजावले.

१) आईने

२) शीला

३) तिच्या

४) समजावले


५) खालील गटातील सर्वनाम नसलेला शब्द निवडा.

१) मी

२) तू

३) गाव

४) त्यांनी

No comments:

Post a Comment