Sunday, 30 November 2025

इयत्ता : दुसरी - मराठी : वचन

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *वचन - एकवचन व अनेकवचन*

****************************

प्र.१) खालील शब्दगटातील अनेकवचनी शब्द ओळखा व पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

१) फूल

२) मांजर

३) झाडे

४) टोपी


प्र.२) खालील शब्दगटातील एकवचनी शब्द ओळखा व पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

१) रस्ते

२) घरे

३) पान

४) झाडे


प्र.३) वाक्यात योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा व पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

आईने टोपलीत ___ ठेवली.

१) फुले

२) फुल

३) फुलां

४) फुली



प्र.४) खालील शब्दगटातील अनेकवचनी शब्द ओळखा व पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

१) घोडा

२) पाटी

३) खेळणी

४) कमळ


प्र.५) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा व पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

गावातील *मुले* मैदानावर धावत होती.

१) एकवचन

२) अनेकवचन

३) बहुवचन

४) उभयवचन

No comments:

Post a Comment