✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *विरामचिन्हे*
****************************
प्र.१) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
“तू आज शाळेला जाणार का?”
१) पूर्णविराम
२) प्रश्नचिन्ह
३) अवतरणचिन्ह
४) स्वल्पविराम
प्र.२) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
अरे बापरे! किती मोठा आवाज झाला!
१) प्रश्नचिन्ह
२) उद्गारचिन्ह
३) स्वल्पविराम
४) पूर्णविराम
प्र.३) खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह नाही.
आई म्हणाली, “लवकर जेवून घे.”
१) प्रश्नचिन्ह
२) दुहेरी अवतरणचिन्ह
३) स्वल्पविराम
४) पूर्णविराम
प्र.४) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
पाटी, पेन्सिल, पुस्तके, खोडरबर माझ्या पिशवीत आहेत.
१) प्रश्नचिन्ह
२) स्वल्पविराम आणि पूर्णविराम
३) अर्धविराम
४) उद्गारवाचक चिन्ह
प्र.५) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
आज शाळेला सुट्टी आहे.
१) स्वल्पविराम
२) उद्गारचिन्ह
३) पूर्णविराम
४) प्रश्नचिन्ह

No comments:
Post a Comment