✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *म्हणी*
****************************
1) इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ योग्य पर्यायातून निवडा.
1. वडीलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार
2. ऐपतीच्या मानाने खर्च करावा
3. बहुसंख्य लोक म्हणतात तेच खरे
4. दोन्ही बाजूंची सारखीच अडचणीची स्थिती
2) आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
1. क्षुल्लक वस्तूंच्या मोबदल्यात मोठा लाभ घेणे
2. दुसऱ्याच्या अनुभवातून आपण धडा घेणे
3. जे नशिबात आले ते भोगणे
4. केलेला उपदेश निष्फळ ठरणे
3) नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा याचा अर्थ कोणता?
1. एकाने काम करावे दुसऱ्याने फायदा घ्यावा
2. विचार न करता बोलणे
3. सर्व माणसे सारखी नसतात
4. नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचं
4) पळसाला पाने ____
1. एक
2. दोन
3. तीन
4. चार
5) एका हाताने ____वाजत नाही.
1. सुरपेटी
2. ताशा
3. ढोल
4. टाळी

No comments:
Post a Comment