Wednesday, 31 December 2025
NCF 2005, NEP 2020 आणि निपुण भारत CTET साठी उपयुक्त टेस्ट
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रश्नमंजुषा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती
प्रश्नमंजुषा
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
इयत्ता : दुसरी - गणित : लहान–मोठेपणा शैक्षणिक खेळ
यशवंत प्रश्नमाला
इयत्ता : दुसरी – गणित
लहान–मोठेपणा शैक्षणिक खेळ
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
इयत्ता : दुसरी - गणित : लहान–मोठेपणा प्रश्नावली
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : लहान–मोठेपणा शैक्षणिक खेळ*
****************************
प्र.१) ३५ ⬜ ५८ योग्य चिन्ह निवडा.
१) >
२) <
३) =
४) X
प्र.२) खालीलपैकी ५० पेक्षा लहान संख्या ओळखा.
१) ६२
२) ५९
३) ४८
४) ७१
प्र.३) ७४ ⬜ ७४ योग्य चिन्ह वापरा.
१) >
२) <
३) =
४) V
प्र.४) ६२ ⬜ ६५ या उदाहरणात योग्य लहान–मोठेपणा निवडा.
१) >
२) <
३) =
४) X
प्र.५) खालील संख्यांमधून ४५ पेक्षा मोठी संख्या निवडा.
१) ३९
२) ४२
३) ४५
४) ४७
प्र.६) सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती आहे?
१) ९
२) १०
३) ११
४) ९९
प्र.७) सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे?
१) ९८
२) ९९
३) १००
४) ९७
प्र.८) खालीलपैकी अचूक लहान–मोठेपणा कोणता आहे?
१) २७ > ७२
२) ८४ < ९१
३) ६५ > ७८
४) ४९ > ५४
प्र.९) ६ ⬜ १६ याचे योग्य वाचन कोणते?
१) ६ मोठे १६ पेक्षा
२) १६ लहान ६ पेक्षा
३) ६ लहान १६ पेक्षा
४) ६ बरोबर १६
प्र.१०) खालीलपैकी ९० पेक्षा मोठी संख्या ओळखा.
१) ८९
२) ९०
३) ९१
४) ८८
इयत्ता : चौथी - बुद्धिमत्ता : क्रम ओळखणे प्रश्नावली
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : चौथी - बुद्धिमत्ता : क्रम ओळखणे*
****************************
१) २, ५, १०, १७, ?
१) २४
२) २६
३) २५
४) २७
२) २, ३, ५, ७, ११, ?
१) १३
२) १५
३) १२
४) १७
३) ०, ३, ८, १५, २४, ?
१) ३२
२) ३४
३) ३५
४) ३०
४) १, १, २, ३, ५, ८, ?
१) ११
२) १३
३) १०
४) १५
५) ३, ६, १२, २४, ४८, ?
१) ९०
२) ९६
३) १००
४) ८४
६) १००, ९५, ८५, ७०, ?
१) ६०
२) ५५
३) ५०
४) ४५
७) १, ८, २७, ६४, ?
१) १००
२) १२१
३) १२५
४) ८१
८) ५, ७, १०, १४, १९, ?
१) २४
२) २३
३) २५
४) २६
९) १३, २२, ३१, ४०, ?
१) ४८
२) ४९
३) ५०
४) ५१
१०) ४, १२, ३६, ?
१) ७२
२) १००
३) १०८
४) ९६
इयत्ता : चौथी - बुद्धिमत्ता : क्रम ओळखणे शैक्षणिक खेळ
यशवंत प्रश्नमाला
इयत्ता : चौथी – बुद्धिमत्ता
क्रम ओळखणे
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
Monday, 29 December 2025
इयत्ता : दुसरी - गणित : मागची पुढची व मधली संख्या शैक्षणिक खेळ
यशवंत प्रश्नमाला
इयत्ता : दुसरी – गणित
मागची, पुढची व मधली संख्या
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
इयत्ता : दुसरी - गणित : मागची पुढची व मधली संख्या
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : मागची पुढची व मधली संख्या*
****************************
१) ३२ व ३४ या संख्यांच्या मधली संख्या कोणती ?
१) ३१
२) ३३
३) ३५
४) ३०
२) ‘५९’ या संख्येच्या पुढची संख्या कोणती ?
१) ५८
२) ६०
३) ६१
४) ५७
३) ‘७०’ या संख्येच्या मागची संख्या कोणती ?
१) ७१
२) ६९
३) ६८
४) ७२
४) ४५, __, ४७ रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?
१) ४४
२) ४६
३) ४८
४) ४९
५) ८० च्या पुढची संख्या कोणती ?
१) ७९
२) ८१
३) ८२
४) ७८
६) __, २९, ३० रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?
१) २७
२) २८
३) ३१
४) २६
७) ‘६५’ या संख्येच्या मागची व पुढची संख्या कोणती ?
१) ६४ व ६६
२) ६३ व ६७
३) ६४ व ६७
४) ६५ व ६६
८) ९१, ९२, __ रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?
१) ९०
२) ९३
३) ९४
४) ८९
९) २७ व २९ या संख्यांच्या मधली संख्या कोणती ?
१) २६
२) २८
३) ३०
४) २५
१०) ‘४०’
या संख्येच्या मागची संख्या कोणती ?
१) ३९
२) ४१
३) ४२
४) ३८
साप्ताहिक चाचणी 19 चा निकाल
यशवंत प्रश्नमाला
श्री. संदीप पाटील, दुधगांव. 9096320023
साप्ताहिक चाचणी क्रमांक १९ चा निकाल
तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि निकाल पहा
Sunday, 28 December 2025
लिहून ठेवा… कलेक्टरच होणार
Saturday, 27 December 2025
रोज सकाळी भेटणारा महान शास्त्रज्ञ : लुई पाश्चर
रोज सकाळी भेटणारा महान शास्त्रज्ञ : लुई पाश्चर
हा महान शास्त्रज्ञ रोज सकाळी तुमच्या-आमच्या भेटीला येतो.
कुठे म्हणून काय विचारता?
सकाळी घरात येणाऱ्या दुधाच्या पिशवीवर छापलेला एक शब्द पाहा— “पाश्चराइज्ड”.
हा शब्द ज्याच्या नावावरून आला, तो शास्त्रज्ञ म्हणजे लुई पाश्चर.
लुई पाश्चर यांच्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया.
दूध, ताक, वाइन यांसारखे नाशवंत पदार्थ जर तापवले नाहीत, तर काही तासांतच ते नासतात. कारण त्यामध्ये सूक्ष्म जंतू वेगाने वाढतात. दूध सुमारे ६० अंश सेल्सिअसपर्यंत तापवून लगेच थंड केल्यास हे जंतू निष्क्रिय होतात आणि दूध लगेच नासत नाही. म्हणूनच गावागावांतील गोठ्यांतून ३६ ते ४८ तासांपूर्वी काढलेले दूध आपल्या घरापर्यंत पोहोचते, तरी ते ताजेच राहते.
दूध नासण्यामागे जंतू कारणीभूत असतात, हा सिद्धांत प्रथम लुई पाश्चर यांनी मांडला आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग दाखवून दिला. त्यांच्या सन्मानार्थ या प्रक्रियेला पाश्चरायझेशन असे नाव देण्यात आले.
आंबणे, फसफसणे, नासणे ही केवळ रासायनिक क्रिया नसून ती जैविक प्रक्रिया आहे आणि तिच्यामागे विशिष्ट जंतू असतात, हे पाश्चरने ठामपणे सिद्ध केले. या प्रक्रियेसाठी त्यानेच फरमेंटेशन हा शब्द रूढ केला. ज्या प्रक्रियेत उपयुक्त पदार्थ तयार होतात ती फरमेंटेशन, तर जिथे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात ती प्युट्रीफिकेशन.
विशेष म्हणजे, पाश्चरने संशोधन सुरू केले तेव्हा या शोधांचा वैद्यकशास्त्राशी संबंध असेल, याची त्यालाही कल्पना नव्हती. तो मूळचा रसायनशास्त्रज्ञ होता. केवळ औत्सुक्यापोटी त्याने जीवशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि पुढे तोच त्याचा आयुष्याचा ध्यास बनला.
१८६४ साली फ्रान्सची वाइन इंडस्ट्री अचानक अडचणीत आली. तयार झालेली वाइन आंबट होऊन व्हिनेगरमध्ये रूपांतरित होऊ लागली. हा देशासाठी मोठा आर्थिक फटका होता. सरकारने पाश्चरला पाचारण केले. पाश्चरने वाइन खराब करणारे जंतू शोधले आणि उपायही सुचवला. वाइन ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गरम केल्यास जंतू नष्ट होतात आणि वाइनचा दर्जा टिकून राहतो, हे त्याने दाखवून दिले. हाच उपाय पुढे दुधासाठी वापरला गेला.
यानंतर रेशीम उद्योगावर संकट कोसळले. रेशीम अळ्यांवर संसर्गजन्य रोग पसरला होता. अळ्या मरू लागल्या, कोश नष्ट झाले आणि उत्पादन थांबले. पाश्चरने या रोगामागे एक प्रोटोझोआ असल्याचे शोधले आणि त्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे रेशीम उद्योग वाचला. पुढे त्याने कोंबड्यांमधील चिकन कॉलरावरही यशस्वी उपाय शोधला.
या सगळ्या संशोधनाचा कळस म्हणजे लसीकरणाचा शोध. आज ‘लस’ हा शब्द आपल्यासाठी सामान्य आहे, पण त्या काळी या संकल्पनेचे अस्तित्वच नव्हते. पाश्चरने अँथ्रॅक्सवर प्रयोग करताना एक क्रांतिकारी गोष्ट शोधली— मृत जंतू शरीराला जिवंत जंतूंविरुद्ध लढायला शिकवतात. हाच लसीकरणाचा पाया होता.
यानंतरचा त्याचा सर्वात महान शोध म्हणजे रेबीजवरील लस. रेबीजचे जंतू त्याला प्रत्यक्ष दिसत नव्हते, कारण ते तंत्रज्ञानच उपलब्ध नव्हते. पण निरीक्षण, प्रयोग आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याने लस तयार केली. ९ वर्षांचा जोसेफ मिस्टर हा पाश्चरच्या लसीमुळे रेबीजमधून वाचलेला जगातील पहिला रुग्ण ठरला. त्या घटनेनंतर संपूर्ण जगाचे लक्ष पाश्चरकडे वेधले गेले.
आयुष्याच्या उत्तरार्धात पाश्चरला लकवा झाला, तरीही त्याची संशोधनाची जिद्द थांबली नाही. १८८८ साली त्याच्या स्मरणार्थ इन्स्टिट्यूट पाश्चर या संस्थेची स्थापना करण्यात आली.
पाश्चरचे कर्तृत्व मोजण्यासाठी शब्द अपुरे पडतात. आजची मायक्रोबायोलॉजी, लसीकरण, जंतुसिद्धांत— या साऱ्या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पाया रचणारा माणूस म्हणजे लुई पाश्चर.
रोज सकाळी दुधाची पिशवी हातात घेताना
एक क्षण थांबा…
त्या पिशवीवर छापलेल्या शब्दामागे उभा असलेला
हा महान शास्त्रज्ञ आठवा.
लुई पाश्चरला मनापासून सलाम.
साप्ताहिक चाचणी क्रमांक 19
दहा वर्षाचा देशभक्त श्रवणसिंह
वय अवघं दहा वर्षं.
खेळण्यांत रमायचं, शाळेच्या गप्पा मारायचं वय.
पण पंजाबच्या फेरोजपूर जिल्ह्यातील एका सीमावर्ती गावात राहणाऱ्या श्रवण सिंहच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता— “देशासाठी आपण काय करू शकतो?”
ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारत–पाकिस्तान सीमेवर वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. प्रत्येक क्षण धोक्याचा. उन्हाची तीव्र झळ, सततची सतर्कता, शारीरिक आणि मानसिक थकवा झेलत भारतीय जवान देशरक्षणासाठी ठाम उभे होते. अशाच कठीण परिस्थितीत एक छोटंसं पाऊल, पण मोठा दिलासा देणारं योगदान समोर आलं—श्रवण सिंहचं.
श्रवण रोज घरातून दूध, चहा, पाणी, ताक, बर्फ घेऊन थेट जवानांपर्यंत पोहोचायचा.
कोणाच्या सूचनेवरून नाही.
कुठलाही मोबदला नको म्हणून नाही.
फक्त मनापासून, सैनिकांबद्दल असलेल्या आदरातून.
धोका स्पष्ट होता, पण भीती त्याच्या पावलांमध्ये नव्हती. त्याच्या लहानशा शरीरात मोठं धैर्य दडलं होतं. जवानांसाठी श्रवण केवळ दूध किंवा चहा देणारा मुलगा नव्हता, तर थकलेल्या मनाला आधार देणारी माणुसकीची भावना होता. त्याच्या निरागस हास्याने अनेक चेहऱ्यांवर हसू उमटलं, तर क्षणभर तरी युद्धसदृश तणाव हलका झाला.
ही शांत सेवा, हा न बोलता दिलेला आधार अखेर देशाच्या नजरेत आला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान सैनिकांसाठी केलेल्या या सेवेमुळे श्रवण सिंहला राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार एका मुलाचा असला, तरी तो देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द जपणाऱ्या प्रत्येक बालमनाचा गौरव आहे.
श्रवण सिंहची कथा आपल्याला एक साधा पण खोल संदेश देते,
देशभक्ती फक्त घोषणांत नसते.
ती शस्त्रांपुरती मर्यादित नसते.
ती छोट्या कृतींतून, माणुसकीतून, निस्वार्थ सेवेतूनही उमटते.
वय लहान असू शकतं, पण भावना मोठ्या असतील तर कार्य महान ठरतं.
आज श्रवण सिंह हे नाव ऑपरेशन सिंदूरमधील एका शांत, पण शक्तिशाली देशभक्तीचं प्रतीक बनलं आहे.
इयत्ता : दुसरी - गणित : दोन अंकी संख्या तयार करणे शैक्षणिक खेळ
यशवंत प्रश्नमाला
इयत्ता : दुसरी – गणित
दोन अंकी संख्या तयार करणे
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
इयत्ता : दुसरी - गणित : दोन अंकी संख्या तयार करणे
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : दोन अंकी संख्या तयार करणे.*
****************************
प्र.१) ३ व ५ या अंकांपासून तयार होणारी योग्य संख्या कोणती?
१) ५३
२) ५७
३) ३८
४) ५९
प्र.२) ‘चोपन्न’ ही संख्या तयार करण्यासाठी दशक व एककस्थानी कोणते अंक येतात?
१) ५ व ४
२) ४ व ५
३) ६ व ४
४) ५ व ६
प्र.३) *६ ही संख्या तयार केली असता तिचे वाचन ‘छप्पन्न’ असे होते तर * च्या ठिकाणी कोणता अंक येईल?
१) ४
२) ५
३) ६
४) ७
प्र.४) ९ हा अंक दोन वेळा वापरल्यास खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल?
१) नव्वद
२) नव्याण्णव
३) एकोणनव्वद
४) नव्व्याऐंशी
प्र.५) ७ व ४ या अंकांपासून तयार होणारी संख्या सत्तेचाळीस असल्यास त्या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक आहे?
१) ७
२) ४
३) ५
४) ६
प्र.६) ८ व २ या अंकांपासून खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल?
१) २८
२) २९
३) २७
४) २५
प्र.७) ‘पस्तीस’ या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती?
१) ६
२) ८
३) ५
४) ३
प्र.८) दशकस्थानी ९ व एककस्थानी १ असलेली संख्या कोणती?
१) ९०
२) ९२
३) ९१
४) ९९
प्र.९) दशक व एककस्थानी समान अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती आहेत?
१) ८
२) ९
३) १०
४) ७
प्र.१०) ० व ६ या अंकांपासून योग्य संख्या कोणती?
१) ०६
२) ६०
३) ६६
४) १६
इयत्ता : चौथी - इंग्रजी : Body Parts शैक्षणिक खेळ
Yashwant Prashnamala
Std : 4th – English
Topic : Body Parts
Shri. Sandip Patil Sir, Dudhgaon
9096320023
इयत्ता : चौथी - इंग्रजी : Body Parts
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : चौथी - इंग्रजी : Body Parts*
****************************
१) We can take smell of flowers with _____.
१) eyes
२) ears
३) nose
४) face
२) _____ is not a sensory organ.
१) eye
२) ear
३) nose
४) hear
३) Which part of the body is useful for tasting food?
१) nose
२) tongue
३) teeth
४) lips
४) Which part of the body acts as a pump?
१) heart
२) brain
३) palm
४) hand
५) Digestion of food is done by _____.
१) lungs
२) mouth
३) stomach
४) waist
६) A song is heard with the help of _____.
१) ears
२) nose
३) eyes
४) mouth
७) We use the following part of the body for wearing socks.
१) finger
२) feet
३) wrist
४) arm
८) Which is not a part of the hand?
१) lungs
२) wrist
३) fingers
४) elbow
९) We chew food with the help of _____.
१) tongue
२) teeth
३) hand
४) stomach
१०) Which part of the body is used to run or walk?
१) fingers
२) shoulder
३) legs
४) thighs
Wednesday, 24 December 2025
इयत्ता : दुसरी - गणित : १ ते १०० अंक शैक्षणिक खेळ
यशवंत प्रश्नमाला
इयत्ता : दुसरी – गणित
विषय : १ ते १०० अंक
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
इयत्ता : दुसरी - गणित : १ ते १०० अंक
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : १ ते १०० अंक*
****************************
प्र.१) ‘एकोणीस’ ही संख्या अंकात कशी लिहाल ?
१) ९१
२) १९
३) २९
४) ११
प्र.२) ‘४५’ ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?
१) पंचेचळीस
२) पस्तीस
३) पंचावन्न
४) पंचेचाळीस
प्र.३) ‘६८’ या संख्येचे अक्षरी वाचन कोणते ?
१) अडसष्ट
२) अठ्ठावन्न
३) अडतीस
४) अडुसष्ट
प्र.४) खालीलपैकी योग्य जोडी कोणती ?
१) ३२ = बत्तीस
२) २३ = बत्तीस
३) ४२ = बत्तीस
४) २२ = बत्तीस
प्र.५) ‘*५’ यामध्ये * च्या ठिकाणी कोणता अंक आल्यास संख्येचे वाचन पस्तीस होईल ?
१) ३
२) ४
३) ५
४) ६
प्र.६) ‘सदुसष्ट’ या संख्येसाठी दशक व एकक यांची योग्य जोडी कोणती ?
१) ५ व ७
२) ६ व ७
३) ७ व ६
४) ६ व ५
प्र.७) ‘एक्याऐंशी’ ही संख्या अंकात कशी लिहाल ?
१) ८१
२) १८
३) ९१
४) ७१
प्र.८) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
१) ४८ - अठ्ठेचाळीस
२) ५६ - छप्पन्न
३) ७२ - बाहत्तर
४) ६३ - त्र्याण्णव
प्र.९) ‘**’ यामध्ये * च्या ठिकाणी कोणता अंक आल्यास वाचन तेहट्टीस होईल ?
१) १
२) २
३) ३
४) ४
प्र.१०) दोन अंकी संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
१) १०
२) ९९
३) ५४
४) ७८
Tuesday, 23 December 2025
इयत्ता : चौथी - गणित : वर्तुळ शैक्षणिक खेळ
यशवंत प्रश्नमाला
इयत्ता : चौथी – गणित
विषय : वर्तुळ
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
इयत्ता : चौथी - गणित : वर्तुळ
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : चौथी - गणित : वर्तुळ*
****************************
प्र. 1 वर्तुळाला किती केंद्रबिंदू असतात?
1. एक
2. दोन
3. तीन
4. अनेक
प्र. 2 वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात?
1. व्यास
2. जीवा
3. त्रिज्या
4. परीघ
प्र. 3 एका वर्तुळाला किती त्रिज्या असू शकतात?
1. एक
2. दोन
3. ठराविक
4. अनेक
प्र. 4 वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात?
1. त्रिज्या
2. व्यास
3. जीवा
4. परीघ
प्र. 5 वर्तुळकेंद्रातून जाणारी आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी रेषा कोणती?
1. जीवा
2. त्रिज्या
3. व्यास
4. कंस
प्र. 6 व्यासाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1. व्यास सर्वात लहान जीवा आहे
2. व्यास आणि त्रिज्या समान असतात
3. व्यास सर्वात मोठी जीवा आहे
4. व्यासाला केंद्र नसते
प्र. 7 वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला काय म्हणतात?
1. क्षेत्रफळ
2. परीघ
3. आंतरभाग
4. बाह्यभाग
प्र. 8 वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला काय म्हणतात?
1. बाह्यभाग
2. कंस
3. परीघ
4. आंतरभाग
प्र. 9 वर्तुळाच्या बाहेर असलेल्या भागाला काय म्हणतात?
1. आंतरभाग
2. परीघ
3. बाह्यभाग
4. जीवा
प्र. 10 परीघाच्या लहान किंवा मोठ्या भागाला काय म्हणतात?
1. व्यास
2. त्रिज्या
3. वर्तुळकंस
4. जीवा
Monday, 22 December 2025
इयत्ता : दुसरी - मराठी : सामान्य ज्ञान शैक्षणिक खेळ
यशवंत प्रश्नमाला
इयत्ता : दुसरी – मराठी
विषय : सामान्य ज्ञान
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
















