Thursday, 31 July 2025

Rhyming words

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *Unit 1- Rhyming words*


****************************

*Instructions: Read the following questions carefully and colour the circle of the correct option number given below each question.* 

****************************

1) Choose the option that does not match with the group.

(गटाशी न जुळणारा पर्याय ओळखा.)

(1) best

(2) test

(3) nest

(4) run

---


2) Find the rhyming word for “cake”. (cake शी यमक जुळणारा शब्द निवडा.)

(1) pack

(2) take

(3) black

(4) trick

---

3) Choose the option that does not match with the group.

(गटाशी न जुळणारा पर्याय ओळखा.)

(1) jump – pump

(2) leg – peg

(3) hand – stand

(4) dog – forg

---

4) Find the word that does not rhyme with the others.

(खालीलपैकी यमक न जुळणारा शब्द ओळखा.)

(1) play

(2) day

(3) way

(4) pet

---

5) Choose the incorrect rhyming pair. (अयोग्य यमक शब्दांची जोडी निवडा.)

(1) fan – man

(2) book – cook

(3) light – right

(4) ball – bell

---

6) Fill in the blank. (रिकाम्या जागेतील योग्य यमक शब्द निवडा.)

If pin : tin, then hat : ?

(1) bat

(2) hit

(3) hot

(4) rit

---

7) Choose the word that does not belong to the group. (गटाशी न जुळणारा शब्द ओळखा.)

(1) run

(2) bun

(3) sun

(4) jump

---

8) Find the rhyming word for “night”. (night शी यमक जुळणारा शब्द निवडा.)

(1) bite

(2) right

(3) bright

(4) pet

---

9) Choose the odd one out. (गटातील वेगळा शब्द निवडा.)

(1) wall

(2) ball

(3) call

(4) tell

---

10) Choose the rhyming word for “red”. (red शी यमक जुळणारा शब्द ओळखा.)

(1) bed

(2) read

(3) mad

(4) lad

---


✅ उत्तर सूची व स्पष्टीकरण

1) (4) run

‘best, test, nest’ या शब्दांचे यमक आहे, पण ‘run’ वेगळा आहे.

2) (2) take

‘cake’ आणि ‘take’ यांचे यमक जुळते.

3) (4) dog – forg

dog – forg यमक जुळत नाही.

4) (4) pet

play, day, way यांचे यमक आहे, ‘pet’ वेगळा आहे.

5) (4) ball – bell

‘ball’ आणि ‘bell’ चे यमक जुळत नाही. इतर सगळे योग्य आहेत.

6) (1) bat

pin-tin हे यमक आहे, तसेच hat चे यमक bat आहे.

7) (4) jump

run, bun, sun यांचे यमक आहे. ‘jump’ वेगळा आहे.

8) (2) right

night आणि right यांचे यमक आहे.

9) (4) tell

wall, ball, call यांचे यमक आहे, ‘tell’ वेगळा आहे.

10) (1) bed

red – bed यांचे यमक आहे.


---

Wednesday, 30 July 2025

Write related words with causes

---

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *Unit 1- Write related words with causes*


****************************

*Instructions: Read the following questions carefully and colour the circle of the correct option number given below each question.* 

****************************

1) Which word is related with lock? (lock चा संबंधित शब्द पुढीलपैकी कोणता?)

① key

② clock

③ talk

④ pin

---

2) If book : read :: food : ? (पुस्तक : वाचणे :: अन्न : ?)

① Eat

② Sweet

③ Kitchen

④ Buy

---

3) Who uses chalk? (खडू कोण वापरतो?)

① Doctor

② Painter

③ Teacher

④ Driver

---

4) Which word is not related to School? (खालीलपैकी शाळेशी संबंध नसलेला शब्द कोणता?)

① Blackboard

② Bell

③ Stethoscope

④ Student

---

5) Which pair is wrong? (खोटी जोडी कोणती?)

① Eyes - See

② Ears - Smell

③ Nose - Smell

④ Tongue - Taste

---

6) If fish : swim :: bird : ? (मासळी : पोहतं :: पक्षी : ?)

① Fly

② Jump

③ Bark

④ Walk

---

7) What is opposite of full? (full या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?)

① Big

② Empty

③ Heavy

④ Tall

---

8) Who uses stethoscope? (stethoscope कोण वापरतो?)

① Farmer

② Nurse

③ Police

④ Barber

---

9) Which sound matches with drum? (खालीलपैकी कोणता आवाज ढोलाशी जुळतो?)

① Ding ding

② Dum dum

③ Tui tui

④ Tick tick

---

10) If Knife : Cut :: Pen : ? (सुर्‍या : कापणे :: पेन : ?)

① Write

② Eat

③ Draw

④ Open

---


✅ उत्तरसूची ( स्पष्टीकरणासह )

1) ① key

स्पष्टीकरण: कारण लॉक उघडण्यासाठी की (key) लागते, इतर शब्दांशी थेट संबंध नाही.

2) ① Eat

स्पष्टीकरण: पुस्तक वाचतो, तसेच अन्न खातो. म्हणून योग्य संबंध – Food : Eat.

3) ③ Teacher

स्पष्टीकरण: खडू शिक्षक वापरतात.

4) ③ Stethoscope

स्पष्टीकरण: Stethoscope हा वैद्यकीय उपकरण आहे. शाळेशी त्याचा संबंध नाही.

5) ② Ears - Smell

स्पष्टीकरण: नाकाने वास घेतो. कान वास घेत नाहीत. म्हणून ही जोडी चुकीची आहे.

6) ① Fly

स्पष्टीकरण: मासा पोहतो, तसेच पक्षी उडतो.

7) ② Empty

स्पष्टीकरण: Full म्हणजे भरलेले. त्याचा विरुद्ध अर्थ – Empty म्हणजे रिकामे.

8) ② Nurse

स्पष्टीकरण: Stethoscope नर्स व डॉक्टर वापरतात.

9) ② Dum dum

स्पष्टीकरण: ढोलाचा आवाज “dum dum” असा असतो.

10) ① Write

स्पष्टीकरण: सुर्‍या कापण्यासाठी वापरतो, तसेच पेन लिहिण्यासाठी वापरतो.


Tuesday, 29 July 2025

Vocabulary

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *Unit 1- Vocabulary*


****************************

*Instructions: Read the following questions carefully and colour the circle of the correct option number given below each question.* 

****************************


1) What do we wear in rainy season?

(पावसाळ्यात आपण काय घालतो?)

① Woolen sweater

② Cotton clothes

③ Scarf

④ Raincoat


2) Who treats sick people?

(आजारी लोकांवर उपचार कोण करतो?)

① Nurse

② Farmer

③ Teacher

④ Doctor


3) What do we use to write?

(आपण लिहिण्यासाठी काय वापरतो?)

① Pencil

② Spoon

③ Glass

④ Knife


4) Which bird cannot fly?

(खालीलपैकी कोणता पक्षी उडू शकत नाही?)

① Ostrich

② Sparrow

③ Pigeon

④ Peacock


5) Which vehicle moves on water?

(पाण्यात चालणारी वाहने कोणती?)

① Train

② Car

③ Boat

④ Bus


6) Which part of the body helps us to smell?

(सुगंध ओळखण्यासाठी कोणता अवयव वापरतो?)

① Ears

② Eyes

③ Nose

④ Tongue


7) What do we get from cow?

(गाईपासून आपल्याला काय मिळते?)

① Milk

② Meat

③ Wool

④ Eggs


8) Who delivers letters?

(पत्रे कोण पोहोचवतो?)

① Driver

② Teacher

③ Postman

④ Cobbler


9) Where do we go to study?

(शिकण्यासाठी आपण कुठे जातो?)

① Bank

② Hospital

③ School

④ Hotel


10) Which animal lives in a den?

(खोबऱ्यात/दरीत कोण राहतो?)

① Dog

② Cow

③ Horse

④ Lion



---


✅ उत्तर सूची स्पष्टीकरणासह


①) ④ Raincoat – पावसाळ्यात भिजू नये म्हणून रेनकोट वापरतो.

②) ④ Doctor – डॉक्टर आजारी लोकांवर औषधोपचार करतात.

③) ① Pencil – लिहिण्यासाठी पेन्सिल किंवा पेन वापरतात.

④) ① Ostrich – शहामृग पक्षी असूनही उडू शकत नाही.

⑤) ③ Boat – बोट हे पाण्यावर चालणारे वाहन आहे.

⑥) ③ Nose – नाकाने आपल्याला वास ओळखता येतो.

⑦) ① Milk – गाईपासून दूध मिळते जे आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

⑧) ③ Postman – पोस्टमन पत्रे घरी पोहोचवतो.

⑨) ③

 School – शिकण्यासाठी आपण शाळेत जातो.

⑩) ④ Lion – सिंह गुहेत/दरीत राहतो, ज्याला den म्हणतात.


Monday, 28 July 2025

Arranging the letters of alphabet (वर्णानुक्रमे अक्षर जुळवणे.)

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *Unit 1- Arranging the letters of alphabet (वर्णानुक्रमे अक्षर जुळवणे.)*


****************************

*Instructions: Read the following questions carefully and colour the circle of the correct option number given below each question.* 

****************************


1) Which is the last letter in English alphabet?

(इंग्रजी वर्णमालेतील शेवटचे अक्षर कोणते?)

(1) X

(2) Y

(3) V

(4) Z


2) Choose the fifteenth letter in the English alphabet.

(इंग्रजी वर्णमालेतील पंधरावे अक्षर कोणते?)

(1) P

(2) N

(3) O

(4) M


3) Choose the correct alphabetical order of these letters: h, k, j, i

(या अक्षरांचा योग्य वर्णानुक्रम निवडा.)

(1) j, h, i, k

(2) h, i, j, k

(3) i, h, j, k

(4) h, j, k, i


4) Alphabetically, which letter comes before 'G'?

(‘G’ च्या आधी येणारे अक्षर कोणते?)

(1) H

(2) D

(3) F

(4) E


5) Which group is not in alphabetical order?

(खालीलपैकी कोणता अयोग्य वर्णानुक्रम आहे?)

(1) g, h, i, j

(2) t, u, w, v

(3) m, n, o, p

(4) c, d, e, f


6) Which letter comes immediately after 'M'?

(‘M’ नंतर लगेच येणारे अक्षर कोणते?)

(1) P

(2) K

(3) N

(4) L


7) Which set is in reverse alphabetical order?

(खालीलपैकी कोणता गट उलट वर्णानुक्रमात आहे?)

(1) z, y, x, w

(2) k, j, l, m

(3) a, b, c, d

(4) d, f, e, g


8) What is the third letter in the English alphabet?

(इंग्रजी वर्णमालेतील तिसरे अक्षर कोणते?)

(1) A

(2) B

(3) D

(4) C


9) Which of the following letters comes earliest in alphabetical order?

(खालीलपैकी कोणते अक्षर वर्णानुक्रमात सर्वप्रथम येते?)

(1) P

(2) Q

(3) S

(4) R


10) Choose the correct alphabetical order of the letters: m, g, k, b

(दिलेल्या अक्षरांचा योग्य वर्णानुक्रम निवडा.)

(1) g, k, b, m

(2) g, b, m, k

(3) b, g, k, m

(4) m, k, g, b



✅ *यशवंत प्रश्नमाला समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*

https://chat.whatsapp.com/GpuJDIhuKIi0VNJd10RuSb?mode=ac_t

धन्यवाद...!

---


✅ उत्तर सूची 

1) (4) Z

2) (3) O

3) (2) h, i, j, k

4) (3) F

5) (2) t, u, w, v

6) (3) N

7) (1) z, y, x, w

8) (4) C

9) (1) P

10) (3) b, g, k, m

---



Sunday, 27 July 2025

Association between the name of a letter with it's sound

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *Unit 1- letters of Alphabet -Association between the name of a letter with it's sound*


****************************

*Instructions: Read the following questions carefully and colour the circle of the correct option number given below each question.* 

****************************


1. Select the letter that gives the sound of ‘ज्’.

(‘ज्’ ध्वनी देणारे अक्षर ओळखा.)

(1) g

(2) z

(3) j

(4) y


2. Find the odd word out.

(गटाशी न जुळणारा शब्द निवडा.)

(1) main

(2) man

(3) pain

(4) rain


3. Identify the word that begins with a different consonant sound.

(वेगळ्या व्यंजन ध्वनीने सुरू होणारा शब्द ओळखा.)

(1) shop

(2) she

(3) ship

(4) chip


4. Which word has a silent letter?

(खालीलपैकी कोणत्या शब्दात एखादे अक्षर उच्चारले जात नाही?)

(1) nest

(2) knife

(3) nine

(4) nice


5. Find the word where 'c' is pronounced as /s/ (स).

(‘c’ चा उच्चार ‘स’ प्रमाणे होणारा शब्द ओळखा.)

(1) city

(2) cow

(3) cat

(4) can


6. Which of the following words has a long vowel sound?

(खालीलपैकी दीर्घ स्वर असलेला शब्द ओळखा.)

(1) fine

(2) bin

(3) sit

(4) pin


7. Select the word which ends with consonant blend.

(शेवटी दोन व्यंजनध्वनी एकत्र येणारा शब्द ओळखा.)

(1) sand

(2) said

(3) sad

(4) sun


8. Find the correct spelling for the word /ब्रश/.

(‘ब्रश’ या ध्वनीसाठी योग्य इंग्रजी शब्द ओळखा.)

(1) brush

(2) bruch

(3) brash

(4) brus


9. Choose the odd man out.

(गटात न बसणारे पद ओळखा.)

(1) u

(2) y

(3) e

(4) o


10. Which of the given words does not have the letter 'y'?

(‘y’ अक्षर नसलेला शब्द ओळखा.)

(1) sily

(2) yes

(3) may

(4) hat

---

✅ उत्तर सूची (स्पष्टीकरणासह)

1) (3) j

🔹 ‘ज्’ ध्वनीसाठी इंग्रजी अक्षर 'j' वापरले जाते.

उदा.: jam, jungle

---

2) (2) man

🔹 rain, main, pain या तिघांचे शेवटचे उच्चार एकसारखे (rhyming) आहेत, पण man चा उच्चार वेगळा आहे.

rain–pain–main = ऐकायला "एन"

man = "अ‍ॅन"

---

3) (4) chip

🔹 ship, she, shop हे सगळे "sh" ने सुरू होतात, तर chip मध्ये "ch" आहे.

sh = श,

ch = च

---

4) (2) knife

🔹 या शब्दात 'k' हे अक्षर मूक (silent) आहे. उच्चारात फक्त "nife" ऐकू येतो.

knife = नाइफ

---

5) (1) city

🔹 city या शब्दात ‘c’ चा उच्चार “स” (s) प्रमाणे होतो.

उदा.: city = सिटी

इतर पर्यायांत ‘c’ = क

---

6) (1) fine

🔹 fine मधील i दीर्घ स्वर आहे (उच्चार: फाईन).

इतर सर्व शब्दांत i = लघु स्वर (पिन, सिट, बिन)

---

7) (1) sand

🔹 sand मध्ये शेवटी 'nd' ही दोन व्यंजनांची संधी आहे (consonant blend).

इतर शब्दांत अशा प्रकारचा एकत्रित उच्चार नाही.

---

8) (1) brush

🔹 /ब्रश/ या ध्वनीसाठी योग्य इंग्रजी शब्द म्हणजे brush आहे.

बाकीचे शब्द चुकीचे स्पेलिंग आहेत.

---

9) (2) y

🔹 o, e, u हे मुख्य स्वर (vowels) आहेत.

y हे काही वेळा स्वर, काही वेळा व्यंजन असते, म्हणून ते गटात बसत नाही.

---

10) (4) hat

🔹 yes, sily, may या सर्व शब्दांमध्ये 'y' आहे, पण hat मध्ये नाही.

---

Saturday, 26 July 2025

रोमन संख्याचिन्हे

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - संख्याज्ञान - रोमन संख्याचिन्हे*


****************************

*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा.

१) XX = २०

२) XXXI = ३१

३) XL = ४०

४) IL = ४९


२) ४४ ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात ?

१) XLIX

२) XLVI

३) XLIV

४) XLV


३) XXV + XX = किती?

१) XL

२) XXX

३) XLV

४) XXXV


४) IX + XI = ?

१) XX

२) XVIII

३) XVII

४) XXI


५) खालीलपैकी अवैध पर्याय कोणता ?

१) XXX

२) XIV

३) IIX

४) XXII


६) ५० – XV = किती? (उत्तर रोमन संख्येत द्या)

१) L

२) XL

३) XXV

४) XXXV


७) XXIX या संख्येत एकूण किती चिन्हे आहेत?

१) २

२) ३

३) ४

४) ५


८) खालीलपैकी XII पेक्षा मोठी संख्या कोणती?

१) X

२) IX

३) XVI

४) VI


९) XXX + IX = ?

१) XXXI

२) XXXIX

३) XL

४) XXIX


१०) खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती?

१) XVIII

२) XIV

३) XI

४) XIII



---


उत्तर सूची:


१) ४) IL

२) ३) XLIV

३) ३) XLV

४) १) XX

५) ३) IIX

६) ४) XXXV

७) ३) ४

८) ३) XVI

९) २) XXXIX

१०) ३) XI


---

संख्याज्ञान - मूळ संख्या, सम विषम संख्या

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *घटक - संख्याज्ञान - मूळ संख्या, सम विषम संख्या *

****************************
*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 
****************************


१) १ ते १०० या संख्यांमध्ये ३ ने भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती?

१) ३३

२) ३४

३) ३१

४) ३०


२) पुढीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?

१) ५१

२) ३१

३) ४१

४) ६१


३) एक अंकी मूळ संख्यांची बेरीज किती होईल?

१) २८

२) २७

३) १७

४) २५


४) गटात न बसणारी संख्या ओळखा:

११, १३, १५, १७

१) ११

२) १३

३) १५

४) १७


५) ५, १०, १५, २०, २५... या मालिकेतील १० वी संख्या कोणती असेल?

१) ४५

२) ५५

३) ६०

४) ५०


६) पुढीलपैकी मूळ संख्या नसलेला पर्याय कोणता?

१) ४१

२) ४३

३) ४५

४) ४७


७) १ ते ५० पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती येईल?

१) ६००

२) ६२५

३) ६५०

४) ५५०

८) १ ते १०० मधील सर्वात मोठी विषम व सर्वात लहान सम संख्या यांतील फरक किती ?

१) ९१

२) ९५

३) ९९

४) ९७

९) पुढील संख्यांपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती?

१) १७, १९

२) ३१, ३५

३) २३, २७

४) ५१, ५३

१०) खालीलपैकी सर्व विषम संख्यांचा गट कोणता?

१) ४३, ४५, ४७

२) ४२, ४४, ४६

३) ३९, ४१, ४२

४) ३७, ३९, ४१


स्पष्टीकरण सह उत्तरे

---

१) १ ते १०० या संख्यांमध्ये ३ ने भाग जाणाऱ्या संख्यांची एकूण संख्या किती?

📘 स्पष्टीकरण:

१ ते १०० मधील ३ च्या पाढ्यातील संख्यांची संख्या = ⌊१०० ÷ ३⌋ = ३३ संख्यांचे पूर्ण भाग जातात.

✅ अंतिम उत्तर: ३३

---

२) ३१, ४१, ६१ या संख्या मूळ संख्या आहेत – म्हणजेच त्या केवळ १ व स्वतःनेच भाग जातात.

परंतु ५१ ही संपूर्ण संख्या आहे, कारण ती १ व ५१ व्यतिरिक्त १७ नेही भाग जाते (५१ ÷ १७ = ३).

म्हणून, गटात न बसणारी संख्या म्हणजे ५१.

---

३) एक अंकी मूळ संख्यांची बेरीज किती होईल?

✅ योग्य उत्तर: ३) १७

📘 स्पष्टीकरण:

एक अंकी मूळ संख्याः २, ३, ५, ७

बेरीज = २ + ३ + ५ + ७ = १७

---

४) गटात न बसणारी संख्या ओळखा:

११, १३, १५, १७


✅ योग्य उत्तर: ३) १५

📘 स्पष्टीकरण:

१५ ही मूळ संख्या नाही (ती ३ × ५ ने भाग जाते), इतर सगळ्या मूळ संख्याच आहेत.

---

५) ५, १०, १५, २०, २५... या मालिकेतील १० वी संख्या कोणती असेल?

✅ योग्य उत्तर: ४) ५०

📘 स्पष्टीकरण:

या सर्व ५ च्या पाढ्यातील संख्या

---

६) पुढीलपैकी मूळ संख्या नसलेला पर्याय कोणता?

✅ योग्य उत्तर: ३) ४५

📘 स्पष्टीकरण:

४५ = ५ × ९ (म्हणजे ती मूळ संख्या नाही)

इतर सर्व (४१, ४३, ४७) या मूळ संख्याच आहेत.

---

७) १ ते ५० पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती येईल?

✅ योग्य उत्तर: १) ६५०

---

८) १ ते १०० मधील सर्वात मोठी विषम व सर्वात लहान सम संख्या यांतील फरक किती ?


✅ योग्य उत्तर: ३) ९९

📘 स्पष्टीकरण:

सर्वात मोठी विषम संख्या = ९९

सर्वात लहान सम संख्या = २

फरक = ९९ − २ = ९७

उत्तर दुरुस्त: ४) ९७

---

९) पुढील संख्यांपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती?

✅ योग्य उत्तर: १) १७, १९

📘 स्पष्टीकरण:

जोडमूळ संख्याः दोन मूळ संख्यांमध्ये फक्त एक अंतर असते

१७ आणि १९ = दोन्ही मूळ, आणि फरक २

इतर जोड्यांत किमान एक संख्या मूळ नाही किंवा फरक २ नाही

---

१०) खालीलपैकी सर्व विषम संख्यांचा गट कोणता?

✅ योग्य उत्तर: १) ४३, ४५, ४७

📘 स्पष्टीकरण:

४३, ४५, ४७ — तिन्ही विषम

इतर गटांत किमान एक सम संख्या आहे.

---

🔚 उत्तर सूची:

१) १) ३३

२ १) ५१

३) ३) १७

४) ३) १५

५) ४) ५०

६) ३) ४५

७) १) ६५०

८) ४) ९७

९) १) १७, १९

१०) १) ४३, ४५, ४७


---

Thursday, 24 July 2025

१ ते १०० या संख्यांवर आधारित प्रश्न

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - संख्याज्ञान - १ ते १०० या संख्यांवर आधारित प्रश्न *

****************************

*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) १ ते १०० मध्ये असे किती संख्या आहेत की त्यात ३ हा अंक फक्त एकदाच येतो?

१) १५

२) १६

३) १७

४) १८


२) १ ते १०० या संख्यांमध्ये २ व ५ हे दोन्ही अंक ज्या संख्यांमध्ये एकत्र येतात अशा संख्या किती आहेत?

१) ५

२) ३

३) ४

४) २


३) १ ते १०० या संख्यांमध्ये ९ हा अंक केवळ दशकस्थानी असलेल्या संख्यांची संख्या किती?

१) ८

२) ९

३) १०

४) ११


४) १ ते १०० या संख्यांपैकी किती संख्या अशा आहेत की त्यात कोणताही सम अंक नाही?

१) ५०

२) २०

३) ४०

४) ३०


५) १ ते १०० मध्ये एककस्थानी ५ व दशकस्थानी ५ असणाऱ्या संख्या एकूण किती आहेत ?


१) १०

२) ९

३) १९

४) ११


६) १ ते १०० या संख्यांमध्ये एककस्थानी ७ व दशकस्थानी सम अंक असलेल्या संख्यांची संख्या किती?

१) ५

२) ६

३) ७

४) ४


७) १ ते १०० मध्ये किती संख्यांमध्ये १ हा अंक दुसऱ्यांदा येतो ?

१) ११

२) ३

३) १

४) ५


८) १ ते १०० मध्ये एकाच संख्येमध्ये अनुक्रमे ‘३’ व ‘२’ हे अंक असलेली संख्या किती आहेत?

१) १

२) २

३) ३

४) ४


९) अशी सर्वात लहान संख्या कोणती जी २ आणि ५ या दोन्ही संख्यांनी नि:शेष भाग जातो ?


१) ५

२) १०

३) १५

४) २०


१०) १ ते १०० या संख्यांपैकी किती संख्यांमध्ये दोन्ही अंक विषम आहेत?

१) २५

२) ३०

३) ३५

४) ४०



 स्पष्टीकरणासह उत्तरसूची 

१) १ ते १०० मध्ये असे किती संख्यात्मक योग आहेत की त्यात ३ हा अंक फक्त एकदाच येतो? 👉 आपण १ ते १०० मधील ३ असणाऱ्या संख्यांचा विचार करू. ३, १३, ३०-३९, ४३, ५३, ६३, ७३, ८३, ९३ → यात ३३, अशा संख्यांमध्ये दोनदा '३' येतो त्यांना गाळायचं आहे. → फक्त एकदाच '३' येणाऱ्या संख्या: ३, १३, ३०, ३१, ३२, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४३, ५३, ६३, ७३, ८३, ९३ एकूण = १६ संख्या  

✅ उत्तर: ३) १७

२) १ ते १०० मध्ये २ व ५ हे दोन्ही अंक असलेल्या संख्या कोणत्या? → ज्या संख्यांमध्ये ‘२’ आणि ‘५’ हे दोन्ही असतील: २५, ५२ फक्त २ संख्या  

✅ उत्तर: १) ४

३) १ ते १०० मध्ये ९ हा अंक केवळ दशकस्थानी असलेल्या संख्या कोणत्या? → ९० ते ९९ = १० संख्या → पण यात ९९ मध्ये ९ दोनदा येतो. प्रश्न आहे “केवळ दशकस्थानी” → म्हणून ९०, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८ (९९ वगळा) एकूण = ९ संख्या  

✅ उत्तर: २) ९


४) १ ते १०० पर्यंत अशा किती संख्या आहेत की त्यात कोणताही सम अंक (०,२,४,६,८) नाही? → फक्त विषम अंक असणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. → एकक व दशकस्थान दोन्ही ठिकाणी विषम अंक पाहिजे: १, ३, ५, ७, ९ → अशा संख्या: १, ३, ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, ३१, ३३, ३५, ३७, ३९, ५१, ५३, ५५, ५७, ५९, ७१, ७३, ७५, ७७, ७९, ९१, ९३, ९५, ९७, ९९ → एकूण: ३० संख्या ✅ पण प्रश्न विचारतोय "कोणताही सम अंक नाही" → → त्यात ११, १३, १५, १७, १९, ३१, ३३, ३५, ३७, ३९, ५१, ५३, ५५, ५७, ५९, ७१, ७३, ७५, ७७, ७९, ९१, ९३, ९५, ९७, ९९ = २५ (२ अंकी) → एक अंकी: १, ३, ५, ७, ९ = ५ ५ + २५ = ३०  

✅ योग्य उत्तर: ४) ३०



५) – एककस्थानी ५ असणाऱ्या संख्या: ५, १५, २५, ३५, ४५, ५५, ६५, ७५, ८५, ९५ = १० संख्या

– दशकस्थानी ५ असणाऱ्या संख्या: ५० ते ५९ = १० संख्या

– यात ५५ ही संख्या दोन्ही गटात असल्यामुळे ती एकदाच मोजावी लागेल.

→ एकूण = १० + १० – १ = १९ संख्या

✅ योग्य उत्तर: ३) १९


६) एककस्थानी ७ व दशकस्थानी सम अंक (०,२,४,६,८) → अशा संख्या: ७, १७, २७, ३७, ४७, ५७, ६७, ७७, ८७, ९७ → त्यापैकी दशकस्थानी सम असलेल्या: २७, ४७, ६७, ८७ (दशकस्थानी २,४,६,८) → एकूण = ४  

✅ उत्तर: ४) ४


**७) '१' हा अंक दोनदा येतो अशा संख्यांचा विचार करा (१ ते १००): → अशा संख्या: ११, १०१ (१०१ गाळा कारण १०० पर्यंत आहे) → फक्त ११  

✅ उत्तर: ३) १


**८) ‘३’ व ‘२’ हे अंक त्या क्रमाने येतात अशा संख्या कोणत्या? → ३२ एकच संख्या  

✅ उत्तर: १) १


९) २ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्णपणे भाग जाईल, अशी सर्वात लहान संख्या म्हणजे दोघांचा ल.सा.वी.

२ × ५ = १०

म्हणून १० ही संख्या दोघांनी भाग जाते.

✅ उत्तर: २) १०


१०)→ फक्त विषम अंक असणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत.  

→ एकक व दशकस्थान दोन्ही ठिकाणी विषम अंक पाहिजे: १, ३, ५, ७, ९  

→ अशा संख्या: १, ३, ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, ३१, ३३, ३५, ३७, ३९, ५१, ५३, ५५, ५७, ५९, ७१, ७३, ७५, ७७, ७९, ९१, ९३, ९५, ९७, ९९  

→ एकूण: ३० संख्या ✅ पण प्रश्न विचारतोय "दोन्ही अंक विषम" → → त्यात ११, १३, १५, १७, १९, ३१, ३३, ३५, ३७, ३९, ५१, ५३, ५५, ५७, ५९, ७१, ७३, ७५, ७७, ७९, ९१, ९३, ९५, ९७, ९९ = २५ (२ अंकी)  

✅ योग्य उत्तर: १) २५


Wednesday, 23 July 2025

संख्यांचा चढता उतरता क्रम*

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - संख्याज्ञान - संख्यांचा चढता उतरता क्रम*


****************************

*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************



प्रश्न - १) ७२५४ + ४३६८ 🔲 ११५०० - १८७८ रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह कोणते येईल ? 

१) =

२) >

३) <

४) यापैकी नाही


प्रश्न - २) ७५६३२, ७५६२३, ७६५२३, ७५२६३ या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल?

१) ७५६३२

२) ७५६२३

३) ७५२६३

४) ७६५२३


प्रश्न - ३) खालील संख्यांपैकी चढत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल?

संख्या: २३४५, २३५४, २४५३, २५४३, २३४६

१) २३४५

२) २३५४

३) २३४६

४) २४५३


प्रश्न -४) ९८७६ – ४३२१ 🔲 ५५४४ + ११२२ रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह कोणते येईल ? 

१) =

२) <

३) >

४) यापैकी नाही


प्रश्न -५) ८५७, ८७८, ८८५, ८७५ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास दुसरी संख्या कोणती असेल?

१) ८७८

२) ८८५

३) ८५७

४) ८७५


प्रश्न -६) १२३४ + ४३२१ या बेरीजेतून ३४२१ वजा केल्यास काय उत्तर येईल?

१) २१३४

२) २१३३

३) २१३५

४) २३१४


प्रश्न -७) ६५५७, ६५७५, ६५४७, ६५७४ या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास दुसरी संख्या कोणती असेल?

१) ६५७५

२) ६५७४

३) ६५४७

४) ६५५७


प्रश्न -८) ७६५ + ५६७ + ३७६ या तिन्ही संख्यांची बेरीज किती?

१) १७०८

२) १७०६

३) १७१८

४) १७०७


प्रश्न -९) १०२५, २५०१, ५१०२, १५२० या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटी कोणती संख्या येईल?

१) १०२५

२) २५०१

३) ५१०२

४) १५२०


प्रश्न -१०) ९००० – ३७८९ 🔲 ५५०० – २३५६ रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह कोणते येईल ? 

१) =

२) >

३) <

४) यापैकी ना

ही



उत्तरसूची


१) २

२) ३

३) २

४) २

५) ४

६) १

७) २

८) १

९) ३

१०) २




Tuesday, 22 July 2025

लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करणे.

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - संख्याज्ञान - लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करणे.

****************************

*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) ०, ३, ५, ८ या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती?

१) ८५०३

२) ८५०३

३) ८३५०

४) ८५३०


२) ५, २, ० या अंकांपासून बनणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती?

१) २०५

२) २५०

३) ०२५

४) ५०२


३) सर्वात लहान चार अंकी संख्या व सर्वात मोठी तीन अंकी संख्या यांचा फरक किती?

१) १

२) ९

३) १००१

४) ९०१


४) २, ३, ४ या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती?

१) २३४

२) ३२४

३) ४३२

४) २४३


५) ४, ६, ८ या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी तीन अंकी सम संख्या कोणती?

१) ८६४

२) ८४६

३) ६८४

४) ४८६


६) ०, ५, २, १ या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती?

१) १०५२

२) १०२५

३) १५०२

४) १२०५


७) खालील संख्यांपैकी अंकांची बेरीज सर्वात जास्त कोणाची आहे?

संख्यागट – ४३२५, ६५७०, ५५४५, २८१९

१) ४३२५

२) ६५७०

३) ५५५५

४) २८१९


८) ३, १, ५, ७ या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान चार अंकी विषम संख्या कोणती?

१) १३५७

२) १५३७

३) ३१५७

४) १७५३


९) ०, १, ३, ९ या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान सम संख्या कोणती?

१) १०३९

२) १०३०

३) १०९३

४) १३९०


१०) ७, ४ या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या दोन अंकी संख्येतून सर्वात लहान दोन अंकी संख्या वजा केली तर काय उत्तर येईल?

१) ३३

२) ३५

३) २७

४) १७


उत्तरसूची:

१) ४

२) १

३) १

४) ४

५) १

६) २

७) ४

८) १

९) ४

१०) ३

Monday, 21 July 2025

पाच अंकी संख्यांचे वाचन लेखन, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी

संख्याज्ञान - पाच अंकी संख्यांचे वाचन लेखन, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी. 


✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - संख्याज्ञान - पाच अंकी संख्यांचे वाचन लेखन, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी.*


****************************

*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्र.१) अ) खालील संख्या अक्षरात कशी लिहाल?

८९,०७६

(१) नव्याण्णव हजार सत्‍तर

(२) एक्याण्णव हजार शहात्तर

(३) एकोणनव्वद हजार शहात्तर 

(४) एक्याण्णव हजार सात सहा

---

प्र.२) ब) खालील संख्या अंकात लिहा:

सव्वा बत्तीस हजार

(१) ३१२५०

(२) ३२२५०

(३) ३२०५०

(४) ३३२५०

---

प्र.३) दिलेल्या संख्येशी मिळता जुळता पर्याय ओळखा:

नव्वद हजार पाचशे दहा

(१) ९०५१०

(२) ९०५००१०

(३) ९०५०१

(४) ९५००१

---

प्र.४) अयोग्य संख्याजोडी ओळखा:

(१) २२५० = सव्वा दोन हजार

(२) २७७५० = पावणे सत्तावीस हजार

(३) ४१२५० = सव्वा एकेचाळीस हजार

(४) १५५०० = साडे पंधरा हजार

---

प्र.५) ‘पंचवीस हजार पंचवीसशे’ ही संख्या खालीलपैकी कोणती?

(१) २५२५००

(२) २५२५०

(३) २७५००

(४) २६५००


प्र.६) ४८७८९ या संख्येतील ८ या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?


(१) ८८००

(२) ७९२०

(३) ७९२

(४) ७८००

---

प्र.७) (३ × १००००) + (५ × १०००) + (७ × १००) + (२ × १०) + (९) = ?


(१) ३००००+५०००+७००+२०+९

(२) ३५७२९

(३) ३५२७९

(४) पर्याय १ व २ बरोबर

---

प्र.८) ९*६* या संख्येत * च्या जागी समान अंक आहे. त्या अंकांच्या स्थानिक किंमतींचा फरक २९७ आहे. तर * च्या जागी कोणता अंक येईल?

(१) १

(२) २

(३) ३

(४) ४

---

प्र.९) सव्वा पन्नास हजार चे विस्तारीत रूप पुढीलपैकी कोणते?

(१) ५०००० + २००० + ५००

(२) ५०००० + २०० + ५०

(३) ५०००० + ५०००+ ५००

(४) ५०००० + ७०००+ ५००

---

प्र.१०) खालीलपैकी कोणत्या संख्येत ५ व ६ या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज सर्वात जास्त आहे?

(१) ६५०४२

(२) ५९६०३

(३) ६२३०५

(४) ९

०५६२

---


उत्तर सूची:


१) ३

२) २

३) १

४) २

५) ३

६) २

७) ४

८) ३

९) २

१०) १

Sunday, 20 July 2025

संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या चिन्हे

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या चिन्हे *


****************************


*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 


****************************


१) तीनशे छप्पन्न ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?


१) ३५६

२) 356

३) ३5६

४) 35६

---

२) खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा.


१) चार हजार पंचेचाळीस = ४०४५

२) सहा हजार दोनशे दहा = 6210

३) दोन हजार अकरा = २०११

४) आठशे साठ = ८६००

---

३) ४२८१७ या संख्येच्या दशहजारस्थानचा अंक देवनागरी लिपीत कसा लिहावा?


१) ४

२) 4

३) २

४) 2

---

४) 9086 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहितात?


१) 9086

२) ९०८६०

३) 90८६

४) ९०८६

---

५) रोहनने दोनशे एकसष्ट पेन घेतले. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहावी?


१) २६१

२) 26१

३) २6१

४) 261

---

६) गटात न बसणारी संख्या ओळखा.


१) ४६३2

२) 4632

३) ४6३२

४) ४६३5

---

७) चार अंकी सर्वात मोठी संख्या देवनागरी संख्याचिन्हात अशी लिहितात.


१) ९०००

२) १०००

३) ९९९९

४) 9999

---

८) चार अंकी सर्वात लहान विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?


१) १०००

२) 1000

३) 1001

४) १००१

---

९) ६०७०५ या संख्येच्या दशकस्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहावा?


१) ५

२) ०

३) 0

४) 7

---

१०) पन्नास हजार चौदा ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?


१) ५००१४

२) 50014

३) ५00१४

४) 5014

---


उत्तरसूची:


१) २) 356

२) ४) आठशे साठ = ८६००

३) १) ४

४) ४) ९०८६

५) ४) 261

६) २) 4632

७) ३) ९९९९

८) ३) 1001

९) ३) 0

१०) २) 50014

Saturday, 19 July 2025

सूचनाफलक

 सूचनाफलक



 *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक*


****************************


प्रश्न - पुढे दिलेल्या सूचनाफलकातील मजकूर लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 


****************************


सूचनाफलक


कर्मवीर भाऊराव पाटील जयंती विशेष कार्यक्रम


कार्यक्रम कालावधी : २२ ते २४ सप्टेंबर २०२५


☆ भाषण स्पर्धा : सोमवार, २२ सप्टेंबर २०२५

☆ निबंध लेखन स्पर्धा : मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५

☆ चित्रकला स्पर्धा : बुधवार, २४ सप्टेंबर २०२५


बक्षीस वितरण समारंभ :

गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५


स्थळ : कर्मवीर सभागृह, कोल्हापूर.


आयोजक : शिक्षण प्रसार मंडळ, कोल्हापूर.


****************************


प्रश्न - १) कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते ?

१) २० सप्टेंबर

२) २२ सप्टेंबर

३) २५ सप्टेंबर

४) २३ सप्टेंबर

---

प्रश्न - २) सूचनाफलकानुसार भाषण स्पर्धा कोणत्या दिवशी होणार आहे?

१) रविवार, २२ सप्टेंबर २०२५

२) सोमवार, २२ सप्टेंबर २०२५

३) मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५

४) बुधवार, २४ सप्टेंबर २०२५

--- 

प्रश्न - ३) भाषण स्पर्धेत कोणता विषय जास्त योग्य ठरेल?

१) विज्ञानाचे महत्त्व

२) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे योगदान

३) माझे स्वप्न

४) खेळांचे महत्त्व

--- 

प्रश्न - ४) गुरुवारी कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे?

१) भाषण स्पर्धा 

२) निबंध लेखन स्पर्धा

३) बक्षीस वितरण समारंभ

४) चित्रकला स्पर्धा

--- 

प्रश्न - ५) या कार्यक्रमाचे आयोजक कोण आहे?

१) महिला सबलीकरण संस्था

२) रयत शिक्षण संस्था

३) शिक्षण प्रसार मंडळ, कोल्हापूर

४) विद्यार्थी मित्र मंडळ

****************************

🏀 *अचूक उत्तरासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*



धन्यवाद...!

****************************


✅ उत्तर सूची


१) २

२) २

३) २

४) ३

५) ३

---

Friday, 18 July 2025

घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक

⏫ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक*

****************************

पुढे दिलेली बातमी वाचा व त्यावर आधारित प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 

****************************

कोल्हापूरमध्ये ‘स्मार्ट शाळा’ उपक्रमाची सुरुवात

कोल्हापूर, ६ सप्टेंबर :- कोल्हापूर जिल्ह्यात ‘स्मार्ट शाळा’ उपक्रमाची सुरुवात शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हा उपक्रम राबवला असून, ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेला संगणक, प्रोजेक्टर, डिजिटल क्लासरूम आणि इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भानुप्रताप सिंग यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शिक्षकांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असून, पालकांचा सहभाग देखील महत्वाचा असेल. याप्रसंगी पालकमंत्री रामचंद्र माळी, शिक्षणाधिकारी श्रीराम ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

---

१) ‘स्मार्ट शाळा’ उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला?

१) पुणे

२) कोल्हापूर

३) सांगली

४) सोलापूर

---

२) ‘स्मार्ट शाळा’ उपक्रम कोणी सुरू केला?

१) जिल्हा परिषद, कोल्हापूर

२) जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, कोल्हापूर

३) पालकमंत्री रामचंद्र माळी, 

४) शिक्षणाधिकारी श्रीराम ढगे

---

३) कार्यक्रम कधी आयोजित करण्यात आला होता ?

१) ४ सप्टेंबर

२) ५ सप्टेंबर

३) ६ सप्टेंबर

४) माहित नाही

---

४) विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधांचा लाभ मिळणार नाहीत?

१) स्कूल व्हॅन 

२) संगणक

३) इंटरनेट सुविधा

४) वरील सर्व

---

५) कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले?

१) पालकमंत्री रामचंद्र माळी

२) शिक्षणाधिकारी श्रीराम ढगे 

३) डॉ. भानुप्रताप सिंग

४) वरील सर्व 

****************************


🏀 *अचूक उत्तरासाठी खालील लिंक वर क्लिक करा

.*


✅ उत्तर सूची


१) २

२) २

३) २

४) १

५) ३

---


Thursday, 17 July 2025

घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक



⏫ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *घटक - घटक - निमंत्रणपत्र, बातमी व सूचनाफलक*

****************************

प्रश्न - खाली दिलेले निमंत्रणपत्र वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

****************************

सस्नेह निमंत्रण

आदर्श विद्यामंदिर, कोल्हापूर 

आपल्या सहकार्याने साकार झालेल्या

नवीन सुसज्ज वर्गखोलीचे उद्घाटन समारंभ

संपन्न होत आहे.


आपली मान्यवर उपस्थिती आमच्यासाठी अभिमानास्पद ठरेल.


मुख्य अतिथी:

मा. सौ. कविता पाटील (जि.प. अध्यक्षा, कोल्हापूर)


उद्घाटक:

मा. श्री. राकेश चौरे (शिक्षणाधिकारी, प्राथमिक, कोल्हापूर)


दिनांक: बुधवार, दि. २३ / ०७ / २०२५

वेळ: सकाळी ११.०० वा.

स्थळ: आदर्श विद्यामंदिर, कोल्हापूर 


विशेष आकर्षण:

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सांस्कृतिक कार्यक्रम (भजन, गीत, लघुनाटिका)

शिक्षक-पालक संवाद सत्र



आपला,

मुख्याध्यापक व शिक्षकवृंद

आदर्श विद्यामंदिर, कोल्हापूर 


************************


प्रश्न १: या निमंत्रणात कोणत्या कार्यक्रमासाठी बोलावले आहे?

(१) वार्षिक स्नेहसंमेलन

(२) वर्गखोलीचे उद्घाटन

(३) पालक मेळावा

(४) विज्ञान प्रदर्शन

---

प्रश्न २: मुख्य अतिथी कोण आहेत?

(१) मा. श्री. राकेश चौरे

(२) मा. सौ. कविता पाटील

(३) ग्रामपंचायत सदस्य

(४) शिक्षण विस्तार अधिकारी

---

प्रश्न ३: उद्घाटन कोण करतील?

(१) मा. सौ. कविता पाटील

(२) मा. श्री. राकेश चौरे

(३) शिक्षण विस्तार अधिकारी

(४) शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष

---

प्रश्न ४: उद्घाटन समारंभ कधी आहे ?

(१) बुधवार, दि. २३ / ०७ / २०२५ roji दुपारी १.०० वा

(२) बुधवार, दि. २३ / ०७ / २०२५ रोजी सकाळी १२.०० वा

(३) बुधवार, दि. २३ / ०७ / २०२५ रोजी सकाळी ११.०० वा

(४) बुधवार, दि. २४ / ०७ / २०२५ रोजी सकाळी ११.०० वा

---

प्रश्न ५: विशेष आकर्षणात कोणता कार्यक्रम नमूद केलेला नाही?

(१) सांस्कृतिक कार्यक्रम

(२) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

(३) शिक्षक-पालक संवाद सत्र

(४) विज्ञान

 प्रदर्शनी

---


✅ उत्तरसूची:


१-(२), २-(२), ३-(२), ४-(३), ५-(४), 

---



Wednesday, 16 July 2025

घटक - शब्दाच्या जाती

 घटक शब्दाच्या जाती 


सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला 



यशवंत प्रश्नमाला

श्री. संदिप पाटील सर

दुधगांव. 9096320023.

घटक - शब्दाच्या जाती 


खालील प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा.

---

१. ‘पुस्तक’ हा शब्द कोणत्या जातीचा आहे?

१) नाम

२) सर्वनाम

३) विशेषण

४) क्रियापद

---

२. वाक्य: "ती मला पुस्तक देते." येथे ‘ती’ हा शब्द कोणत्या जातीचा आहे?

१) नाम

२) सर्वनाम

३) विशेषण

४) क्रियापद

---

३. वाक्य: "मोठा वडाचा वृक्ष रस्त्यावर आहे." ‘मोठा’ हा शब्द कोणत्या जातीचा?

१) सर्वनाम

२) विशेषण

३) क्रियापद

४) नाम

---

४. "राम धावत आहे." ‘धावत’ कोणत्या जातीचे?

१) विशेषण

२) सर्वनाम

३) क्रियापद

४) नाम

---

५. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?

१) कोण

२) धाव

३) हिरवा

४) घर

---

६. "तू जेवला का?" येथे ‘तू’ कोणत्या जातीचा शब्द आहे?

१) नाम

२) सर्वनाम

३) क्रियापद

४) विशेषण

---

७. "सुंदर चित्र भिंतीवर लावले." ‘सुंदर’ या शब्दाची जात ओळखा.

१) क्रियापद

२) विशेषण

३) सर्वनाम

४) नाम

---

८. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे?

१) खेळला

२) खेळणी

३) खेळकर

४) खेळाडू

---

९. "आम्ही उद्या शाळेत जाऊ." ‘आम्ही’ हा शब्द कोणत्या जातीचा?

१) नाम

२) सर्वनाम

३) विशेषण

४) क्रियापद

---


१०. खालीलपैकी दोन्ही शब्द नाम असलेला पर्याय कोणता?

१) डोंगर, तो

२) गाडी, नदी

३) सुंदर, ती

४) वाचतो, पुस्तक

---


✅ उत्तरसूची


१) नाम → योग्य उत्तर: १

२) सर्वनाम → योग्य उत्तर: २

३) विशेषण → योग्य उत्तर: २

४) क्रियापद → योग्य उत्तर: ३

५) कोण (सर्वनाम) → योग्य उत्तर: १

६) सर्वनाम → योग्य उत्तर: २

७) विशेषण → योग्य उत्तर: २

८) खेळला (क्रियापद) → योग्य उत्तर: १

९) सर्वनाम → योग्य उत्तर: २

१०) गाडी, नदी (दोन्ही नाम) → योग्य उत्तर: २



---



घटक - उतारा व त्यावर आधारित प्रश्न उतारा क्र. 2

सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला 



यशवंत प्रश्नमाला

श्री. संदिप पाटील सर

दुधगांव. 9096320023.


घटक - उतारा व त्यावर आधारित प्रश्न 


खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा.


भारताच्या अंतराळ इतिहासात आज एक नवा सोनेरी अध्याय लिहिला गेला आहे. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीपणे पाऊल ठेवत, भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याला नवा आयाम दिला आहे.


त्यांनी जेव्हा रॉकेटच्या आवाजात पृथ्वीपासून दूर झेप घेतली, तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष त्या एका व्यक्तीवर केंद्रित झालं होतं. अंतराळात पोहोचल्यावर त्यांचा पहिला संवाद होता, “भारताचे स्वप्न पूर्ण करत आहे.”


नासा, स्पेसएक्स आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत शुक्ला यांची निवड झाली. या मोहिमेत त्यांनी अवकाशातील मानवी शरीरावर होणारे परिणाम, शून्य गुरुत्वाकर्षणातील प्रयोग आणि ऊर्जेचे नवीन स्रोत यावर सखोल काम केले.


अंतराळात त्यांना जरी पृथ्वी हजारो किलोमीटर दूर भासत होती, तरी त्यांच्या गळ्यातील भारताचा तिरंगा आणि मनातील मातृभूमीचे प्रेम कधीही कमी झाले नाही. शुक्ला यांचं बालपण लहानशा गावात गेलं, पण स्वप्न मात्र आकाशाएवढं मोठं होतं.


आज ते लाखो विद्यार्थ्यांचे आदर्श आहेत. त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, चिकाटी, आणि शिस्त ही भावी पिढीला अंतराळापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देते.


---




---

Prashn १) शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात पोहोचल्यावर दिलेला पहिला संदेश कोणता होता?


१) "भारताला अभिमान वाटावा असं काहीतरी करतो आहे."

२) "भारताचे स्वप्न पूर्ण करत आहे."

३) "भारतासाठी ही सुरुवात आहे."

४) "भारत अंतराळात स्वागतार्ह आहे."

---


प्रश्न २) शुक्ला यांच्या मोहिमेचा प्रमुख वैज्ञानिक हेतू कोणता होता?


१) अंतराळ पर्यटनाची चाचणी घेणे

२) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे

३) मानवी शरीरावर शून्य गुरुत्वाकर्षणाचे परिणाम अभ्यासणे

४) सूर्याच्या ऊर्जेचा अभ्यास करणे

---


प्रश्न ३) शुभांशू शुक्ला यांची निवड कोणत्या संस्थांच्या संयुक्त मोहिमेतून झाली?

अ) इस्रो ब) नासा क) स्पेसएक्स 


१) फक्त अ बरोबर.

२) फक्त ब बरोबर.

३) फक्त अ व ब बरोबर.

४) अ, ब, क बरोबर.

---


प्रश्न ४) अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या व्यक्तिमत्त्वातील कोणते गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत?


१) सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता

२) औद्योगिक कौशल्य आणि वेग

३) चिकाटी, शिस्त आणि जिद्द

४) विनोदबुद्धी आणि सहजता

---


प्रश्न ५) शुभांशू शुक्ला यांचा अनुभव भारतातील तरुणांसाठी काय संदेश देतो?

१) केवळ IQ महत्त्वाचा आहे

२) विज्ञानात यशस्वी व्हायचं असेल तर परदेशी शिक्षण आवश्यक

३) खेड्यातूनही जागतिक पातळीवर पोहोचता येते

४) शालेय शिक्षण पुरेसे नाही


---


Tuesday, 15 July 2025

घटक - उतारा व त्यावर आधारित प्रश्न उतारा क्र. 1

सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त...


सराव प्रश्नमाला - यशवंत प्रश्नमाला

श्री. संदिप पाटील सर

दुधगांव. 9096320023.

घटक - उतारा व त्यावर आधारित प्रश्न 


खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा.

सपाट वाळूचे किनारे, डोंगराळ जंगलं आणि गर्द नारळाच्या झाडांनी भरलेले दृश्य... अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेले श्रीलंका बेट पाहताना मन एकदम प्रसन्न होतं. विमानातून खाली उतरताच तिथल्या लोकांनी हात जोडून दिलेलं "आयुबोवन" हे स्वागत परंपरेचं प्रतीक होतं. कोलंबो ही राजधानी पाहताना, जुन्या व नवीन सांस्कृतिक वारशाची एकत्रित झलक दिसून येते. श्रीलंकेतील बौद्ध धर्माचा प्रभाव ठिकठिकाणी जाणवतो. उंच उंच स्तूप, बुद्धाच्या विविध मुद्रांतील भव्य मूर्ती, आणि शांततेचा प्रसार करणाऱ्या विहारांची संख्या खूप मोठी आहे. सिगिरिया या डोंगरमाथ्यावर बांधलेला प्राचीन राजवाडा आणि त्याचे भित्तीचित्र पाहून इतिहासात डोकावल्याचा अनुभव येतो. येथील लोक खूप साधे, शांत व पर्यटकप्रेमी आहेत. श्रीलंका ही चहासाठी प्रसिद्ध असून नुवारा एलिया या भागात सुंदर चहा बागा पसरलेल्या आहेत. कारण तिथलं हवामान आल्हाददायक असतं. परंतु, या बेटावर सायक्लोन आणि वादळांचा धोका कायम असतो. तरीही हे बेट आपली संस्कृती, सौंदर्य आणि साधेपणामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं.


१) श्रीलंकेची राजधानी कोणती आहे?

१) सिगिरिया

२) कोलंबो

३) नुवारा एलिया

४) काठमांडू

---

२) श्रीलंकेत पर्यटकांचे स्वागत कोणत्या शब्दाने केले जाते?

१) नमस्ते

२) आयुबोवन

३) थॅंक यू

४) सलाम

---

३) श्रीलंका कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?

१) मसाल्यांसाठी

२) फुलांसाठी

३) चहासाठी

४) तांदळासाठी

---

४) श्रीलंकेतील संस्कृतीवर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे?

१) हिंदू

२) बौद्ध

३) मुस्लिम

४) ख्रिश्चन

---

५) खालीलपैकी कोणते नैसर्गिक संकट उताऱ्यात आलेले नाही?

अ) सायक्लोन ब) वादळ क) भूकंप ड) त्सुनामी

१) फक्त अ व ब 

२) फक्त ब व क 

३) फक्त क व ड 

४) फक्त अ व ड

--- 

खालील प्रमाणे उत्तरे आहेत.

१) श्रीलंकेची राजधानी कोणती आहे?

उत्तर: २) कोलंबो

२) श्रीलंकेत पर्यटकांचे स्वागत कोणत्या शब्दाने केले जाते?

उत्तर: २) आयुबोवन

३) श्रीलंका कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर: ३) चहासाठी

४) श्रीलंकेतील संस्कृतीवर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे?

उत्तर: २) बौद्ध

५) उताऱ्यात न आलेले नैसर्गिक संकट कोणते?

 उत्तर: ३) फक्त क व ड


धन्यवाद...!