Sunday, 31 August 2025

साप्ताहिक चाचणी क्र.४

✅ *यशवंत प्रश्नमाला*
✅ *साप्ताहिक चाचणी क्रमांक चार चे आयोजन*
✅ *श्री. संदीप पाटील सर, दुधगांव.*
*9096320023*

Saturday, 30 August 2025

English - Contracted forms

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English - Contracted forms*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्रश्न १) Choose the correct contracted form. (योग्य contracted form निवडा.)

१) cannot → ca'nt

२) cannot → can't

३) cannot → cann't

४) cannot → cann'ot

प्रश्न २) Which is the correct pair? (योग्य जोडी कोणती?)

१) do not → don't

२) do not → do'nt

३) do not → don'ot

४) do not → d'ont

प्रश्न ३) Find the contracted form of the underlined word. (अधोरेखित शब्दाचा contracted form शोधा.)

He is playing cricket.

१) he's

२) his'

३) hi's

४) he'is

प्रश्न ४) Find the option which is not a correct contracted form. (योग्य contracted form नसलेला पर्याय शोधा.)

१) won't

२) shouldn't

३) must'nt

४) isn't

प्रश्न ५) What is the contracted form of "They are"? (They are चा contracted form कोणता?)

१) The'r

२) The're

३) They're

४) They'ar

प्रश्न ६) Choose the correct contracted form. (योग्य contracted form निवडा.)

१) she is → she'is

२) she is → she's

३) she is → sh'is

४) she is → s'he's

प्रश्न ७) Which contracted form is correct? (योग्य contracted form कोणता?)

१) would not → wouldn't

२) would not → would'nt

३) would not → wo'nt

४) would not → w'ouldn't

प्रश्न ८) Where will you put the apostrophe while making contracted form of "He will"? (He will चा contracted form करताना अपोस्ट्रॉफी कुठे द्याल?)

१) After e

२) Before w

३) After l

४) Before h

प्रश्न ९) Identify the odd one out. (गटात न बसणारा पर्याय ओळखा.)

१) isn't

२) doesn't

३) hasn't

४) is'not

प्रश्न १०) Which is the correct contracted form of "I am"? (I am चा योग्य contracted form कोणता?)

१) Ia'm

२) I'm

३) Iam'

४) Im'

Friday, 29 August 2025

बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान (तुलना)

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान (तुलना)*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) एका चित्रकला स्पर्धेत अमृताला सीमापेक्षा जास्त गुण मिळाले. सीमाला कविता पेक्षा कमी गुण मिळाले. कविताला अश्विनीपेक्षा जास्त गुण मिळाले. तर सर्वात कमी गुण कुणाला मिळाले ?

१) अमृता

२) सीमा

३) कविता

४) अश्विनी

२) पाच विद्यार्थ्यांच्या रांगेत प्रकाशच्या पुढे रोहन होता. रोहन व अजय यांच्या मध्ये फक्त सचिन होता. प्रकाश व रोहन यांच्यामध्ये मिलिंद होता. तर रांगेत मध्यभागी कोण असेल ?

१) रोहन

२) मिलिंद

३) अजय

४) सचिन

३) वर्गातील सर्वात ठेंगणा अनिल होता. विजय अनिलपेक्षा उंच होता पण सुनील इतका उंच नव्हता. राहुल विजयपेक्षा लहान होता. तर सर्वात उंच कोण ?

१) विजय

२) राहुल

३) सुनील

४) अनिल

४) एका गणिती क्रियेत प्रथम गुणाकार, त्यानंतर बेरीज, त्यानंतर वजाबाकी आणि शेवटी भागाकार अशी क्रिया केली. तर शेवटून दुसरी क्रिया कोणती झाली ?

१) बेरीज

२) गुणाकार

३) वजाबाकी

४) भागाकार

५) इयत्ता ४ वीच्या परीक्षेत पल्लवी अनुश्रीच्या खाली होती. अनुश्री मनिषाच्या वर पण प्राजक्ताच्या खाली होती. अमृता प्राजक्ताच्या वर होती. तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा ?

१) अनुश्री

२) पल्लवी

३) मनिषा

४) अमृता

६) कविता मीनाक्षीपेक्षा हुशार होती पण, गौरी इतकी हुशार नव्हती. गौरी व संजना पेक्षा श्वेता हुशार होती. संजना ही मीनाक्षी व कविता यांच्यापेक्षा हुशार होती. तर मध्यम हुशार कोण?

१) गौरी

२) कविता

३) संजना

४) मीनाक्षी

७) सचिन अमोलपेक्षा मोठा आहे. अमोल व नितीन समान वयाचे आहेत. सुरेश हा सचिनपेक्षा मोठा आहे. विजय हा नितीनपेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?

१) अमोल

२) विजय

३) सचिन

४) सुरेश

८) एका स्पर्धेत प्रथम स्थान वरुणने मिळवले. त्याच्या नंतर अमित होता. अमितच्या नंतर किरण होता. किरणच्या आधी सोनाली होती. तर चौथ्या क्रमांकावर कोण?

१) सोनाली

२) किरण

३) अमित

४) वरुण

९) चार भावंडांमध्ये सर्वात उंच सागर होता. रोहन सागरपेक्षा ठेंगणा पण निलेशपेक्षा उंच होता. मयूर हा रोहनपेक्षा ठेंगणा होता. तर सर्वात ठेंगणा कोण?

१) रोहन

२) मयूर

३) निलेश

४) सागर

१०) एका गणिती पद्धतीत प्रथम वजाबाकी, त्यानंतर भागाकार, त्यानंतर बेरीज आणि शेवटी गुणाकार ही क्रिया केली. तर पहिली क्रिया कोणती?

१) गुणाकार

२) वजाबाकी

३) भागाकार

४) बेरीज

Thursday, 28 August 2025

बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - तर्कसंगती व अनुमान*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) राजेशचे आजचे वय ३६ वर्षे आहे व त्याच्या मुलाचे वय १२ वर्षे आहे. आणखी ८ वर्षांनी त्यांच्यातील वयाचा फरक किती असेल?

१) २४ वर्षे

२) २० वर्षे

३) २८ वर्षे

४) ३० वर्षे

२) सीमा हिचे वय रवीच्या वयाच्या तिप्पट आहे. पाच वर्षांपूर्वी रवीचे वय ८ वर्षे असल्यास सीमाचे आजचे वय किती?

१) २९ वर्षे

२) ३९ वर्षे

३) ३० वर्षे

४) ३४ वर्षे

३) अजय व त्याचा भाऊ यांच्या वयांची बेरीज ४५ वर्षे आहे. ५ वर्षांनंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल?

१) ५५ वर्षे

२) ६० वर्षे

३) ४० वर्षे

४) ५० वर्षे

४) प्रिया, किरण व पूजा यांच्या आजच्या वयाची बेरीज ४८ वर्षे आहे. तर ३ वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती?

१) ३९ वर्षे

२) ४२ वर्षे

३) ४५ वर्षे

४) ३६ वर्षे

५) रोहनचे आजचे वय १८ वर्षे आहे. अमोलचे वय रोहनच्या दुप्पटीपेक्षा ६ ने कमी आहे. अमोलचे आजचे वय किती?

१) ३० वर्षे

२) ३२ वर्षे

३) २९ वर्षे

४) ३६ वर्षे

६) स्नेहा व तिच्या आईच्या वयाची बेरीज ५५ वर्षे आहे. ३ वर्षांनंतर आईचे वय ४२ वर्षे होईल. तर स्नेहाचे आजचे वय किती?

१) १२ वर्षे

२) १३ वर्षे

३) १५ वर्षे

४) १४ वर्षे

७) वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज ६८ वर्षे आहे व त्यांच्यातील फरक २८ वर्षे आहे. तर मुलाचे आजचे वय किती आहे?

१) २० वर्षे

२) २२ वर्षे

३) २१ वर्षे

४) २५ वर्षे

८) सुनीलचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा ७ ने जास्त आहे. जर आईचे आजचे वय ५० वर्षे असेल तर सुनीलचे ३ वर्षांपूर्वीचे वय किती होते?

१) २० वर्षे

२) १८ वर्षे

३) २७ वर्षे

४) २९ वर्षे

९) अनिलच्या वडिलांचे वय त्याच्या वयाच्या दुप्पट आहे. जर ४ वर्षांपूर्वी वडिलांचे वय ४४ वर्षे होते तर त्या वेळी अनिलचे वय किती होते?

१) २२ वर्षे

२) २० वर्षे

३) १८ वर्षे

४) २४ वर्षे

१०) आई व मुलीच्या वयाची बेरीज ६० वर्षे आहे. जर मुलगी आईपेक्षा २४ वर्षांनी लहान असेल तर मुलीचे आजचे वय किती?

१) १७ वर्षे

२) २० वर्षे

३) १८ वर्षे

४) १५ वर्षे

Wednesday, 27 August 2025

५१,००० भेटींचा टप्पा पूर्ण मनःपूर्वक आभार

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *५१,००० भेटींचा टप्पा पूर्ण मनःपूर्वक आभार*

आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर "यशवंत प्रश्नमाला" या ब्लॉगने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. आजपर्यंत या ब्लॉगला ५१,००० पेक्षा अधिक वाचकांनी भेट दिली. ही आनंददायी आणि अभिमानास्पद बाब आहे. हे यश केवळ आकड्यांमध्ये मोजण्यासारखे नाही, तर यात असलेल्या विश्वास, प्रोत्साहन आणि पाठिंब्याचे प्रतिबिंब आहे.

हा ब्लॉग सुरू करताना उद्दिष्ट एकच होते — विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना उपयुक्त ठरेल, अशी प्रश्नमाला, शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देणे. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोपे, दर्जेदार आणि समजण्यासारखे साहित्य मिळावे, यासाठी हा प्रयत्न सुरू झाला. आज या ब्लॉगला मिळालेला प्रतिसाद पाहता, हा उपक्रम योग्य दिशेने चालल्याचे समाधान मिळते.

या प्रवासात अनेक शिक्षकांनी सतत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नियमित वापर करून सूचना दिल्या. मित्रपरिवाराने तांत्रिक मदत केली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाचकांनी दाखवलेला विश्वास कायम ठेवला. यामुळेच ५१,००० या टप्प्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

आता पुढील वाटचाल अधिक समृद्ध आणि व्यापक करण्याचा मानस आहे. अभ्यासासाठी अजून उपयुक्त प्रश्नमाला, शैक्षणिक खेळ, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि आधुनिक शैक्षणिक साधनं या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

शेवटी, या प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येक वाचकाला, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि शुभेच्छुकांना मनःपूर्वक धन्यवाद. आपला विश्वास आणि प्रोत्साहनच आम्हाला पुढे नेणारी खरी ताकद आहे.

५१,००० भेटींच्या टप्प्यावरून पुढील शिखरे सर करण्यासाठी आपण सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद असेच मिळत राहो, हीच अपेक्षा.

मराठी व्याकरण - वचन (एकवचन-अनेकवचन)

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी व्याकरण - वचन (एकवचन-अनेकवचन)*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्र.१) पुढील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन ओळखा.

"शेतकरी शेतात बैलांसह नांगरत होता."

बैलांसह

१) एकवचन

२) अनेकवचन

३) उभयवचन

४) आदरार्थी बहुवचन

प्र.२) पुढील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन सांगा.

"विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळवले."

विद्यार्थ्यांनी

१) एकवचन

२) अनेकवचन

३) उभयवचन

४) आदरार्थी बहुवचन

प्र.३) "आईने मुलासाठी खेळणे आणले." या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन कोणते?

खेळणे

१) एकवचन

२) अनेकवचन

३) उभयवचन

४) आदरार्थी बहुवचन

प्र.४) खालील शब्दसमूहात विसंगत शब्द निवडा.

१) झाडे

२) पाखरे

३) माळी

४) फळे

प्र.५) खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांचे एकवचन-अनेकवचन योग्य जुळले आहे?

१) झाड – झाडी

२) फूल – फुले

३) पाणी – पाने

४) घर – घरटे

प्र.६) पुढील शब्दाचे वचन बदलून योग्य पर्याय निवडा.

"वाडा"

१) वाडा 

२) वाडी

३) वाडे 

४) वडे 

प्र.७) "शिते" या शब्दाचे एकवचन योग्य कोणते?

१) शित

२) शिते

३) शीते

४) शीत

प्र.८) खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते?

१) मासे

२) झरे

३) फुले

४) खडू

प्र.९) पुढील पर्यायांतील वेगळा पर्याय कोणता आहे?

१) भाऊ

२) दिशा

३) पुस्तक

४) सभा

प्र.१०) पुढील पर्यायांतील वेगळा पर्याय निवडा.

१) डोळे

२) झाडे

३) घरे

४) पक्षी

Tuesday, 26 August 2025

भागाकार - तीन अंकीला दोन अंकीने भागणे

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *भागाकार (तीन अंकीला दोन अंकीने भाग)*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्रश्न १ ) ९० ला ९ ने भागले असता उत्तर काय येईल?

१) १०

२) ९

३) १

४) १००

प्रश्न २ ) एका वर्गात २५० विद्यार्थी आहेत. त्यांना ५ गटांत समान विभागले तर प्रत्येक गटात किती विद्यार्थी असतील?

१) ५०

२) ४०

३) ६०

४) ३०

प्रश्न ३ ) भागाकाराच्या उदाहरणात, बाकी नेहमी भाजकापेक्षा असते.

१) जास्त

२) कमी

३) समान

४) दुप्पट

प्रश्न ४ ) एका शेतकऱ्याकडे २८० आंबे आहेत. त्याने हे आंबे ७ पेटींमध्ये समान भरले तर प्रत्येक पेटीत किती आंबे येतील ?

१) ३०

२) ४०

३) ५०

४) ३५

प्रश्न ५) ४२० ला ३ ने भागले असता येणाऱ्या भागाकारातून ३० वजा केल्यास उत्तर किती येईल ?

१) १२०

२) १००

३) ११०

४) ९०

प्रश्न ६ ) ९५ ला ३ ने भागले असता भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल ?

१) भागाकार ३१, बाकी २

२) भागाकार ३०, बाकी ५

३) भागाकार ३२, बाकी १

४) भागाकार ३१, बाकी १

प्रश्न ७ ) पुढील उदाहरणात निःशेष भाग कोणत्या पर्यायातील उदाहरणात जाईल ?

१) ४५ ÷ ७

२) ६० ÷ १०

३) ७५ ÷ ८

४) २० ÷ ३

प्रश्न ८ ) ४२० वस्तू समान १० गटांमध्ये वाटल्या, तर प्रत्येक गटात किती वस्तू येतील ?

१) ४२

२) ४०

३) १२

४) ५०

प्रश्न ९ ) भाज्य = ? X भागाकार + बाकी. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?

१) गुणक 

२) भाजक 

३) शून्य 

४) यापैकी नाही

प्रश्न १० ) खालीलपैकी सर्वात कमी भागाकार कोणाचा येईल?

१) ८० ÷ ५

२) १०० ÷ ४

३) ९० ÷ ९

४) ५० ÷ १०

Monday, 25 August 2025

यशवंत प्रश्नमाला - साप्ताहिक चाचणी क्र. ३ निकाल

गुणाकार (तीन अंकीला दोन अंकीने गुणणे)

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गुणाकार (तीन अंकीला दोन अंकीने गुणणे)*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) एखाद्या संख्येचा १२ पट = ६० असेल तर ती संख्या कोणती ?

१) ५

२) ७

३) ६

४) १२

२) एका वहीची किंमत ₹ २५ आहे. अशा ४ डझन वह्या घेतल्या तर किती रुपये लागतील ?

१) ₹ १००

२) ₹ १२००

३) ₹ १२५०

४) ₹ १५००

३) ९९ x ९९ = ?

१) ९८०१

२) ९०९९

३) ९००१

४) १००९९

४) ७० × ? = ४९० यात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?

१) ६

२) ७

३) ८

४) ९

५) एखाद्या संख्येला १० ने गुणिले तर ती संख्या किती अंकांनी वाढते ?

१) ० अंकांनी

२) १ अंकांनी

३) २ अंकांनी

४) ३ अंकांनी

६) २५ × २५ = ?

१) ५२५

२) ५६५

३) ६२५

४) ५७५

७) एका खोलीत प्रत्येक रांगेत १५ खुर्च्या आहेत. अशा १२ रांगा असतील तर त्या खोलीतील एकूण खुर्च्या किती ?

१) १८०

२) १६०

३) १७५

४) २००

८) ९९ × १०१ = ?

१) ९९९९

२) ९९०१

३) १००९९

४) ९०९९

९) खालीलपैकी कोणता सर्वात लहान गुणाकार आहे ?

१) २ x ५००

२) १० x १००

३) २५ x ३०

४) ५ x १००

१०) गुण्य ३००

 व गुणक ० असल्यास गुणाकार किती येईल ?

१) ३००

२) ०

३) ३०००

४) ३०

Saturday, 23 August 2025

साप्ताहिक चाचणी क्रमांक तीन

Finding small words from the bigger ones

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *Unit 1- Finding small words from the bigger ones.*

****************************

*Instructions: Read the following questions carefully and colour the circle of the correct option number given below each question.* 

****************************

1) Which body part is hidden in the word “handkerchief”?

“handkerchief” या शब्दात लपलेला शरीराचा भाग कोणता?

(1) head

(2) chief 

(3) and

(4) hand

---

2) Rearranging the letters of “Tap”, which meaningful word can you form?

“Tap” या शब्दाची अक्षरे वापरून तयार होणारा दुसरा अर्थपूर्ण शब्द कोणता?

(1) pat

(2) atp

(3) tap

(4) all

---

3) How many two-letter meaningful words can you make from the word “Plant”?

“Plant” या शब्दापासून किती दोन-अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात?

(1) 1

(2) 2

(3) 3

(4) 4

---

4) Find the bird name hidden in the word “peacock”.

“peacock” या शब्दात लपलेला पक्ष्याचे नाव शोधा.

(1) hen

(2) air

(3) man

(4) cock

---

5) Choose the word from “Computer” that is not meaningful.

“Computer” या शब्दातून तयार झालेला पण अर्थ नसलेला शब्द निवडा.

(1) put

(2) term

(3) cop

(4) cumo

---

6) What is the opposite of the word: “fast”?

'fast' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

(1) slow

(2) run

(3) stop

(4) last

---

7) In which of the following word “pen” isn't hidden?

खालीलपैकी कोणत्या शब्दात “pen” हा शब्द लपलेला नाही?

(1) pencil

(2) opened

(3) depend

(4) Operation

---

8) Make a meaningful word using a single proper letter to complete: _able.

_able या शब्दात एक अक्षर घालून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

(1) b

(2) r

(3) t

(4) m

---

9) choose the meaningful word made by the word - 'Teacher'

'Teacher' पासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द निवडा.

(1) eac

(2) cher 

(3) ach

(4) tea 

---

10) Choose the correct meaningful word from “Student”.

“Student” पासून तयार होणारा योग्य अर्थपूर्ण शब्द निवडा.

(1) den

(2) stude

(3) ents

(4) denst

---

Friday, 22 August 2025

English - Word - Register

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *Unit 1- Word - Register* 
****************************
*Instructions: Read the following questions carefully and colour the circle of the correct option number given below each question.* 
****************************

1) Which word does not belong to the group?

खालील गटात न बसणारा शब्द ओळखा.

Fish, Frog, Lizard, Book

(1) Frog

(2) Lizard

(3) Fish

(4) Book

---

2) Find the matching word from the list.

(यादीतील शब्दांशी जुळणारा शब्द शोधा.)

Driver, Pilot, Captain,

(1) Dancer

(2) Singer

(3) Teacher

(4) Loko pilot 

---

3) Which is related to school?

(खालीलपैकी कोणती वस्तू शाळेशी संबंधित आहे?)

(1) Fork

(2) Pillow

(3) Blackboard

(4) Balloon

---

4) Choose the incorrect pair.

(चुकीची जोडी ओळखा.)

(1) Bird – Nest

(2) Fish – Water

(3) Cow – Cowshed 

(4) Chicken – Eatan

---

5) Which word ends with 't'?

('t' या अक्षराने शेवट होणारा शब्द कोणता?)

(1) Ball

(2) Cat

(3) Dog

(4) Pen

---

6) What are these related to?

(हे शब्द कशाशी संबंधित आहेत?)

Rose, Lily, Sunflower, Jasmine

(1) Fruits

(2) Trees

(3) Flowers

(4) Leaves

---

7) Choose the correct chain word.

(शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांची साखळी पूर्ण करा.)

mat → tiger → rat → ?

(1) ear 

(2) top

(3) rock

(4) rain

---

8) Identify the profession.

(खालील वस्तूंशी संबंधित व्यक्ती ओळखा.)

Spanner, Screwdriver, Wrench, Oil

(1) Teacher

(2) Doctor

(3) Mechanic

(4) Artist

---

9) Find the word that is not a fruit.

(फळ नसलेला शब्द शोधा.)

(1) Mango

(2) Apple

(3) Pineapple

(4) Onion

---

10) Which word is not related to cricket?

(खालीलपैकी कोणता शब्द क्रिकेटशी संबंधित नाही?)

(1) Wicket

(2) Bat

(3) Helmet

(4) Net

---

Thursday, 21 August 2025

मराठी - उद्देश व विधेय

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - उद्देश व विधेय*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्र. १) खालील वाक्यातील उद्देश ओळखून त्याचा योग्य पर्याय निवडा.

राम बागेत फिरत होता.

१) राम

२) बागेत

३) फिरत

४) होता

प्र. २) खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

शेतकरी शेतात काम करत आहे.

१) शेतकरी

२) शेतात

३) काम

४) करत आहे

प्र. ३) खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

पक्षी झाडावर बसले होते.

१) पक्षी

२) झाडावर

३) बसले

४) होते

प्र. ४) खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

आईने मला गरम भाकरी दिली.

१) आईने

२) मला

३) भाकरी

४) गरम

प्र. ५) खालील वाक्यातील उद्देश ओळखा.

विठ्ठल मंदिरात गेला.

१) मंदिरात

२) गेला

३) विठ्ठल

४) मंदिर

प्र. ६) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

सीमा शाळेत शिकत आहे.

१) शिकत आहे

२) शाळेत शिकत आहे

३) सीमा शिकत आहे

४) शाळेत

प्र. ७) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

मी उद्या पुण्याला जाणार आहे.

१) पुण्याला जाणार आहे

२) उद्या जाणार आहे

३) मी जाणार आहे

४) उद्या पुण्याला जाणार आहे

प्र. ८) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

मुलं मैदानात खेळत होती.

१) मुलं खेळत होती

२) खेळत होती

३) मैदानात खेळत होती

४) मुलं मैदानात

प्र. ९) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

तो दुपारी झोपला होता.

१) दुपारी झोपला होता

२) झोपला होता

३) तो झोपला होता

४) दुपारी होता

प्र. १०) खालील वाक्यातील विधेय ओळखा.

वडील दिवसभर काम करतात.

१) काम करतात

२) दिवसभर करतात

३) दिवसभर काम करतात

४) वडील काम करतात

Wednesday, 20 August 2025

मराठी - विरामचिन्हे

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *मराठी - विरामचिन्हे*

****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 
****************************

प्र. १) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा.

' आज शाळेला सुट्टी आहे ' 

१) प्रश्नचिन्ह

२) पूर्णविराम

३) स्वल्पविराम

४) उद्‌गारचिन्ह

प्र. २) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा.

कुठे चाललात तुम्ही

१) पूर्णविराम

२) स्वल्पविराम

३) उद्‌गारचिन्ह

४) प्रश्नचिन्ह

प्र. ३) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा.

किती गोड गाणे आहे

१) प्रश्नचिन्ह

२) उद्‌गारचिन्ह

३) पूर्णविराम

४) स्वल्पविराम

प्र. ४) खालीलपैकी स्वल्पविराम कोणते ?

१) :

२) ,

३) ;

४) !

प्र. ५) खालीलपैकी पूर्णविराम कोणते ?

१) .

२) ,

३) ?

४) :

प्र. ६) खालीलपैकी दुहेरी अवतरण चिन्ह कोणते ?

१) " "

२) -

३) :

४) ;

प्र. ७) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.

१) किती छान हवामान आहे,

२) किती छान हवामान आहे!

३) किती छान हवामान आहे:

४) किती छान हवामान आहे.

प्र. ८) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.

१) 'सावित्रीबाई फुले' या समाजसुधारक होत्या.

२) सावित्रीबाई फुले या समाजसुधारक होत्या.

३) सावित्रीबाई फुले या समाजसुधारक होत्या,

४) सावित्रीबाई फुले या समाजसुधारक होत्या:

प्र. ९) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.

१) अरे वा काय सुंदर खेळ झाला.

२) अरे वा! काय सुंदर खेळ झाला.

३) अरे वा काय सुंदर खेळ झाला!

४) अरे वा! काय सुंदर खेळ झाला

प्र. १०) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.

१) शाळेतील मुलांनी "जय हिंद" असा घोष दिला.

२) शाळेतील मुलांनी जय हिंद असा घोष दिला.

३) शाळेतील मुलांनी 'जय हिंद' असा घोष दिला.

४) शाळेतील मुलांनी जय हिंद, असा घोष दिला.

Tuesday, 19 August 2025

बेरीज वजाबाकी मिश्र उदाहरणावर आधारित गेम खेळा.

गणित प्रश्नपत्रिका गेम — उत्सवासह

गणित प्रश्नपत्रिका गेम

१) सीमाने १५२५ रुपयांचे कपडे, ८७५ रुपयांच्या चपला व ५५० रुपयाची बॅग खरेदी केली. तिने दुकानदारास ३००० रुपये दिले. तर दुकानदाराने तिला किती रुपये परत देईल?
२) एका गावाची एकूण लोकसंख्या १५७८० आहे. त्यापैकी ९७६० लोक मतदार आहेत. तर मतदार नसलेले किती लोक आहेत?
३) आनंदने ३२५० रुपयांचा मोबाईल, ४५० रुपयांचे कव्हर व ३०० रुपयांचे हेडफोन खरेदी केले. दुकानदाराने २५० रुपयांची सूट दिली. तर आनंदने किती रुपये दिले?
४) एका शाळेत ४८५ विद्यार्थी होते. त्यापैकी ७५ विद्यार्थी शैक्षणिक सहलीला गेले नाहीत. तर किती विद्यार्थी सहलीला गेले?
५) मंगेशचा महिन्याचा पगार १५००० रुपये आहे. त्यापैकी ३५०० रुपये घरभाडे, २५०० रुपये किराणा खर्च व १५०० रुपये प्रवास खर्च झाला. उरलेली रक्कम त्याने बचत केली. तर त्याची बचत किती?
६) गेल्या वर्षी शाळेत २८६५ विद्यार्थी होते. यावर्षी ३२५ नवीन विद्यार्थी आले व १८० विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेले. तर यावर्षी शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
७) एका ग्रंथालयात विज्ञान विषयाची ४७०, गणित विषयाची ३५६ व समाजशास्त्र विषयाची ५२९ पुस्तके आहेत. तर एकूण किती पुस्तके आहेत?
८) एका शेतकऱ्याकडे ६४० आंबे होते. त्याने ४२५ आंबे विकले, ७५ आंबे शेजाऱ्यांना दिले. तर आता त्याच्याकडे किती आंबे उरले?
९) एका गावात ९५१ घरांपैकी ३२७ घरांना गॅस कनेक्शन नाही. तर गॅस कनेक्शन असलेली घरे किती?
१०) एका पुस्तकांच्या दुकानात ७६८ पुस्तके होती. सकाळी ४२९ पुस्तके विकली व दुपारी १९५ पुस्तके परत आणली. तर दुकानात आता किती पुस्तके आहेत?
टीप: ५०% पेक्षा अधिक गुण मिळवले तर उत्सव चालेल. आपण सर्व प्रश्न न निवडल्यास त्रुटी दिसेल.

Monday, 18 August 2025

गणित - बेरीज आणि वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - बेरीज आणि वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) सीमाने १५२५ रुपयांचे कपडे, ८७५ रुपयांच्या चपला व ५५० रुपयांची बॅग खरेदी केली. तिने दुकानदारास ३००० रुपये दिले. तर दुकानदाराने तिला किती रुपये परत देईल?

(१) १०५

(२) ५५

(३) १५५

(४) ५०

२) एका गावाची एकूण लोकसंख्या १५७८० आहे. त्यापैकी ९७६० लोक मतदार आहेत. तर मतदार नसलेले किती लोक आहेत?

(१) ६००२

(२) ५०२०

(३) ५२००

(४) ६०२०

३) आनंदने ३२५० रुपयांचा मोबाईल, ४५० रुपयांचे कव्हर व ३०० रुपयांचे हेडफोन खरेदी केले. दुकानदाराने २५० रुपयांची सूट दिली. तर आनंदने किती रुपये दिले ?

(१) ३७०५०

(२) ३७५००

(३) ३७.५०

(४) ३७५०

४) एका शाळेत ४८५ विद्यार्थी होते. त्यापैकी ७५ विद्यार्थी शैक्षणिक सहलीला गेले नाहीत. तर किती विद्यार्थी सहलीला गेले?

(१) ४१०

(२) ४१५

(३) ४०५

(४) ४२०

५) मंगेशचा महिन्याचा पगार १५००० रुपये आहे. त्यापैकी ३५०० रुपये घरभाडे, २५०० रुपये किराणा खर्च व १५०० रुपये प्रवास खर्च झाला. उरलेली रक्कम त्याने बचत केली. तर त्याची बचत किती?

(१) ७५.००

(२) ७५५०

(३) ७५००

(४) ८५००

६) गेल्या वर्षी शाळेत २८६५ विद्यार्थी होते. यावर्षी ३२५ नवीन विद्यार्थी आले व १८० विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेले. तर यावर्षी शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

(१) ३०११

(२) ३०१०

(३) ३०१२

(४) ३०२५

७) एका ग्रंथालयात विज्ञान विषयाची ४७०, गणित विषयाची ३५६ व समाजशास्त्र विषयाची ५२९ पुस्तके आहेत. तर एकूण किती पुस्तके आहेत?

(१) १३५०

(२) १२५०

(३) १२५५

(४) १३५५

८) एका शेतकऱ्याकडे ६४० आंबे होते. त्याने ४२५ आंबे विकले, ७५ आंबे शेजाऱ्यांना दिले. तर आता त्याच्याकडे किती आंबे उरले?

(१) १४०

(२) १५०

(३) १४५

(४) १३५

९) एका गावात ९५१ घरांपैकी ३२७ घरांना गॅस कनेक्शन नाही. तर गॅस कनेक्शन असलेली घरे किती?

(१) ६२३

(२) ६२४

(३) ६१५

(४) ६२०

१०) एका पुस्तकांच्या दुकानात ७६८पुस्तके होती. सकाळी ४२९ पुस्तके विकली व दुपारी १९५ पुस्तके परत आणली. तर दुकानात आता किती पुस्तके आहेत?

(१) ५३४

(२) ५४३

(३) ५३.४

(४) ५४.३

साप्ताहिक चाचणी क्र. 2 निकाल

गणित - वजाबाकी पाच अंकी संख्यापर्यंत

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - वजाबाकी पाच अंकी संख्यापर्यंत*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) १०००० मधून किती वजा केल्यावर उत्तर ७५२५ येईल?

(१) २४७५

(२) २५७५

(३) ३४७५

(४) २४७०

२) खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर ५०५ येणार नाही ?

(१) ४५०० – ३९९५

(२) २००० – १४९५

(३) ३००० – २४९५

(४) ५०४० – ४५४५

३) ३२००० – १८५०० = ?

(१) १२५००

(२) १३५००

(३) १४५००

(४) १५०००

४) पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून चार अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर किती येईल?

(१) ८९९९१

(२) ९९९९

(३) ९००००

(४) ८९९९०

५) ९००० मधून ४२५० वजा केल्यावर उत्तर किती येईल?

(१) ४६५०

(२) ५७५०

(३) ४७५०

(४) ५७००

६) एका पेटीत ७८२५ आंबे आहेत. त्यापैकी ४३७५ आंबे विकले. उरलेले आंबे किती?

(१) ३३५०

(२) ३४५०

(३) ३२५०

(४) ३३७५

७) कोणत्या संख्येतून २४५० वजा केल्यावर उत्तर ८७५० येईल?

(१) ११२००

(२) १०५००

(३) ११७००

(४) १००००

८) १५००० – ७५०० = ?

(१) ७०००

(२) ७५००

(३) ७६००

(४) ७७००

९) ४२५६ या उदाहरणात चौकटीच्या जागी कोणता अंक येईल? ३५□६ – १२३० = २२२६

(१) ८

(२) ४

(३) ६

(४) ५

१०) एका शेतकऱ्याकडे ४८०० रुपये होते. त्याने खतासाठी २१५० रुपये खर्च केले. त्याच्याकडे आता किती रुपये उरले?

(१) २५५०

(२) २६००

(३) २७५०

(४) २६५०

Friday, 15 August 2025

Writing opposite words

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *Unit 1- Writing opposite words*
****************************
*Instructions: Read the following questions carefully and colour the circle of the correct option number given below each question.* 
****************************

१) Which prefix makes the opposite of the word Honest?
(Honest या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार करण्यासाठी कोणता उपसर्ग वापरावा?)
(१) un
(२) im
(३) in
(४) dis
---

२) What is the opposite word of day?
(Day या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?)
(१) morning
(२) dark
(३) night
(४) light
---

३) Which pair is not of opposite words?
(खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही?)
(१) happy × sad
(२) open × close
(३) big × small
(४) near × close
---

४) Choose the correct opposite of the underlined word:
The bag is heavy.
(अधोरेखित heavy शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.)
(१) thin
(२) thick
(३) light
(४) easy
---

५) Which of the following is a correct pair of opposite words?
(खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे?)
(१) true × false
(२) book × page
(३) pen × paper
(४) cold × wet
---

६) Choose the word that becomes its opposite by adding the prefix 'dis'
(Dis उपसर्ग लावल्याने विरुद्धार्थी होणारा शब्द ओळखा.)
(१) agree
(२) regular
(३) lucky
(४) care
---

७) What is the opposite of the word 'Enter'?
(Enter या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?)
(१) exit
(२) in
(३) forward
(४) leave
---

८) Which of the following does not match the group of opposites?
(पुढीलपैकी कोणता पर्याय विरुद्धार्थी जोडीत बसत नाही?)
(१) right × wrong
(२) up × down
(३) win × lose
(४) give × bring
---

९) Choose the pair that shows correct antonyms:
(योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा.)
(१) god × bad
(२) speak × listen
(३) red × blue
(४) buy × sell
---

१०) What is the opposite word of 'strong'?
(Strong चा विरुद्धार्थी शब्द कोणता?)
(१) short
(२) low
(३) weak
(४) poor

बुद्धिमत्ता - चुकीचे पद ओळखणे

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - चुकीचे पद ओळखणे*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्र.१) १४, १७, २२, २९, ३८, ५३

१) २९

२) ५३

३) १७

४) ३८

प्र.२) १०,११,१२,१७,२५,३२

१) १०

२) १२

३) १७

४) २५

प्र.३) १३, २३, ३३, ४३, ५३

१) ३३

२) ५३

३) १३

४) २३

प्र.४) २५,२७,३१,३७,४४,५५

१) २५

२) ३७

३) ५५

४) ४४

प्र.५) ११, २०,२९,३८,४६,५६

१) ११

२) ४६

३) ५६

४) २०

प्र.६) ५४५,४५०,३५५,२५५,१६५

१) २५५

२) १६५

३) ३५५

४) ५४५

प्र.७) २२,३३३, ४४४४,५५५५५,६६६६६६६

१) ३३३

२) ४४४४

३) ५५५५५

४) ६६६६६६६

प्र.८) ८२,६५,५०,३५,२६

१) ६५

२) ५०

३) ३५

४) २६

प्र.९) २,५,१२,२०,३०,४२

१) ५

२) १२

३) २०

४) ४२

प्र.१०) ३४,५०,६८,८५,१०२ 

१) ५०

२) ६८

३) ८५

४) १०२