Wednesday, 29 October 2025

English - Cardinal and Ordinal Numbers संख्यावाचक आणि क्रमवाचक संख्या

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English - Cardinal and Ordinal Numbers संख्यावाचक आणि क्रमवाचक संख्या*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) How to write fourteenth in short form?

(‘fourteenth’ चे संक्षिप्त रूप कसे लिहाल?)

१) 4th  २) 14th  ३) 40th  ४) 10th


२) Which ordinal number comes after fifth?

(‘fifth’ नंतर कोणता क्रमवाचक अंक येतो?)

१) Fourth  २) Sixth  ३) Seventh  ४) Eighth


३) Which is the correct cardinal number for nineteen?

(‘nineteen’ साठी योग्य संख्यावाचक अंक कोणता?)

१) 90  २) 19th  ३) 19  ४) 9


४) Which of the following is a cardinal number?

(खालीलपैकी कोणता संख्यावाचक अंक आहे?)

१) Second  २) Tenth  ३) 20  ४) Third


५) Choose the correct pair.

(योग्य जोडी निवडा.)

१) Tenth–दहावा  २) Eleventh–अकरा

३) Ninth–नऊ  ४) Third–तीसरा


६) Which ordinal number shows the position of 21st?

(‘21st’ कोणत्या क्रमवाचक संख्येला दर्शवतो?)

१) Twenty  २) Twenty one  ३) Twenty first  ४) Twenty second


७) What comes before twelfth?

(‘twelfth’ च्या आधी काय येते?)

१) Eleventh  २) Thirteenth  ३) Tenth  ४) Fifteenth


८) Fill in the blanks: Twenty nine : Twenty ninth :: Thirty : _______

१) Thirty first  २) Thirtieth  ३) Thirty two  ४) Third


९) Which of the following is not a cardinal number?

(खालीलपैकी कोणता संख्यावाचक अंक नाही?)

१) 18th  २) 18  ३) 17  ४) 19


१०) Find the next ordinal number: Eighth, Ninth, _______

(‘Eighth, Ninth, _______’ मध्ये पुढचा क्रमवाचक अंक शोधा.)

१) Tenth  २) Eleven  ३) Eleveneth  ४) Ten


Tuesday, 28 October 2025

गणित - क्षेत्रफळ (आयत व चौरस)

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *क्षेत्रफळ - आयत व चौरस*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) ८ सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?

१) ६४ २) १६ ३) ३२ ४) ८


२) लांबी १२ मी. आणि रुंदी ९ मी. असलेल्या आयताचे परिमिती किती मीटर असेल?

१) ४२ २) ३८ ३) २१ ४) ४८


३) २० मी. लांबी व ५ मी. रुंदी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळाएवढे क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची बाजू किती मी. असेल?

१) ७ २) ८ ३) १० ४) ५


४) ९ मी. लांबी व ४ मी. रुंदी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळाएवढे क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची बाजू किती मी. असेल?


१) ५  २) ६  ३) ७  ४) ८


५) १४ मी. लांबी व ९ मी. रुंदी असलेल्या आयताकृती बागेभोवती कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल?

१) ३२ २) ४६ ३) ५६ ४) ६४


६) एका आयताची लांबी २० सेमी आणि रुंदी १० सेमी आहे. त्याच परिमितीचा चौरस काढल्यास त्याची बाजू किती असेल?

१) १२ २) १३.५ ३) १५ ४) १०


७) एका बागेचे क्षेत्रफळ २४० चौ.मी. असून तिची लांबी २० मी. आहे, तर रुंदी किती असेल?

१) १२ २) १० ३) १८ ४) १५


८) एका आयताची लांबी ३० मी. व रुंदी १० मी. आहे. त्या आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमितीच्या दुप्पट आहे. तर त्या चौरसाची बाजू किती मीटर आहे?

१) २० २) १५ ३) १० ४) २५


९) २० मी. लांबी व १५ मी. रुंदी असलेल्या मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात ५ मी. बाजूचा चौरस काढून टाकल्यास उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती राहील?

१) ३०० २) २७५ ३) २५० ४) २००


१०) एका आयताचे क्षेत्रफळ १२० चौ.मी. आहे. त्याची रुंदी ८ मी. असेल, तर परिमिती किती मीटर असेल?

१) ४४ २) ४६ ३) ४८ ४) ५०


Monday, 27 October 2025

मराठी - शुद्ध अशुद्ध वाक्यरचना

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - शुद्ध अशुद्ध वाक्यरचना*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १ ते ३ साठी सूचना : खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहेत ते ओळखा. (योग्य पर्याय निवडा.)

१) माझे वडिल नेहमि सकाळी व्यामाला जातात.

१) एक

२) दोन

३) तीन

४) चार


२) त्या मुलिला शिक्षणाची आथुरता आहे.

१) दोन

२) एक

३) तीन

४) चार


३) शाळेच्या परंगणात मुलं खेळत होती.

१) एक

२) दोन

३) तीन

४) चार


सूचना (प्र. ४ ते ६साठी): खालील वाक्यातील अधोरेखित भागाचा शुद्ध शब्द कोणता?


४) शाळेत स्वच्छतेचे महात्व सर्वांना पटवून दिले जाते.

१) महत्व

२) महत्त्व

३) महत्त्वा

४) महत्वा


५) आपण देशभाक्तीची भावना टिकवून ठेवली पाहिजे.

१) देशभक्तीची

२) देशभाक्तिची

३) देशभाक्तीचा

४) देशभकतीची


६) मुलांनी अत्यत कौतुकाने कार्यक्रम पाहिला.

१) अत्यंन्त

२) अत्यंत

३) अतींत

४) अतियंत


सूचना (प्र. ७ ते १० साठी): खालील वाक्यातील एक भाग चुकीचा आहे, तो भाग पर्यायांमधून निवडा.


७) पाहुण्यांनी / मुलींनी / सांस्कृतिक कार्यक्रमाचे / उद्घाटन केले.

१) शाळेच्या

२) मुलींनी

३) सांस्कृतिक कार्यक्रमाचे

४) उद्घाटन केले


८) विद्यार्थ्यांनी / नीटनेटकं / गृहपाठ / पूर्ण केला.

१) विद्यार्थ्यांनी

२) नीटनेटकं

३) गृहपाठ

४) पूर्ण केला


९) शिक्षकांनी / दररोज / वर्गात / मुलांशी /संवाद साधावा/ खेळतात.

१) शिक्षकांनी

२) रोज

३) वर्गात

४) खेळतात


१०) आवडतात / माझ्या / मित्राला / चविष्ट / आवडतो / आमरस 

१) आवडतो

२) मित्राला

३) चविष्ट

४) आवडतात


Wednesday, 15 October 2025

English - Numerical days of Week/ Months

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English - Numerical days of Week/ Months*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) Which day comes before Monday?

(सोमवाराच्या आधी कोणता दिवस येतो?)

१) Friday

२) Wednesday

३) Sunday

४) Tuesday


२) If today is Tuesday, what will be the day after three days?

(आज मंगळवार असेल तर तीन दिवसांनी कोणता वार येईल?)

१) Wednesday

२) Saturday

३) Friday

४) Sunday


३) How many days are there in the month of June?

(जून महिन्यात किती दिवस असतात?)

१) २८

२) ३०

३) २९

४) ३१


४) Which month comes before December?

(डिसेंबरच्या आधी कोणता महिना येतो?)

१) October

२) August

३) September

४) November


५) January : February :: March : ?

(जानेवारी : फेब्रुवारी :: मार्च : ?)

१) May

२) June

३) July

४) April


६) Which is the first month of the year?

(वर्षाचा पहिला महिना कोणता आहे?)

१) January

२) December

३) February

४) March


७) Which month has 30 days?

(३० दिवस असलेला महिना कोणता?)

१) May

२) June

३) December

४) August


८) Choose the correctly spelt word.

(योग्य स्पेलिंग असलेला शब्द निवडा.)

१) February

२) Febuary

३) Febroary

४) Fabrary


९) How many days are there in a week?

(आठवड्यात किती दिवस असतात?)

१) ५

२) ६

३) ८

४) ७


१०) Which day comes just after Wednesday?

(बुधवाराच्या नंतर कोणता दिवस येतो?)

१) Tuesday

२) Friday

३) Monday

४) Thursday

Tuesday, 14 October 2025

गणित - परिमिती

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - परिमिती*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) एका चौरसाची परिमिती ४० सेमी आहे. तर त्या चौरसाच्या एका बाजूची लांबी किती असेल?

१) ८ सेमी

२) १० सेमी

३) १२ सेमी

४) १५ सेमी


२) एका आयताची लांबी २५ सेमी व रुंदी १५ सेमी आहे. तर त्या आयताची परिमिती किती?

१) ४० सेमी

२) ५० सेमी

३) ६० सेमी

४) ८० सेमी


३) एका समभुज त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी २० सेमी आहे. त्याची परिमिती किती असेल?

१) २० सेमी

२) ४० सेमी

३) ५० सेमी

४) ६० सेमी


४) एका आयताकृती शेताची लांबी ५० मीटर आणि रुंदी ३० मीटर आहे. शेताभोवती एक फेरी मारल्यास किती अंतर चालावे लागेल?

१) ६० मी.

२) ८० मी.

३) १०० मी.

४) १६० मी.


५) १५ सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या भोवती दोन पदरी कुंपण लावायचे असल्यास किती सेमी तार लागेल?

१) १२० सेमी

२) ६० सेमी

३) ३० सेमी

४) १५० सेमी


६) एका आयताची लांबी ३२ सेमी आणि परिमिती १०० सेमी आहे. तर त्याची रुंदी किती असेल?

१) १६ सेमी

२) १८ सेमी

३) २० सेमी

४) ३४ सेमी


७) एका त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे ८ सेमी, ९ सेमी आणि १० सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती?

१) २७ सेमी

२) २६ सेमी

३) २८ सेमी

४) ३० सेमी


८) २४ सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे दोन समान भाग केल्यास एका भागाची परिमिती किती होईल?

१) २४ सेमी

२) २० सेमी

३) १८ सेमी

४) १६ सेमी


९) एका मैदानाची लांबी ४५ मी. व रुंदी २५ मी. आहे. त्या मैदानाभोवती तीन वेळा फेरी मारल्यास एकूण किती अंतर पार केले जाईल?

१) ३५० मी.

२) ४२० मी.

३) ४६० मी.

४) ५२० मी.


१०) ३६ सेमी परिमिती असलेल्या चौरसाचा परिघ दुप्पट केल्यास नवीन आकृतीची परिमिती किती होईल?

१) ७२ सेमी

२) ३६ सेमी

३) ४८ सेमी

४) ९० सेमी

गणित - वर्तुळ


✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - वर्तुळ*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचा अंतराला काय म्हणतात?

१) व्यास

२) परीघ

३) त्रिज्या

४) जीवा


२) वर्तुळाला किती केंद्रबिंदू असतात?

१) एक

२) दोन

३) तीन

४) अनेक


३) त्रिज्या ७ सेमी असल्यास व्यासाची लांबी किती असेल?

१) १४ सेमी

२) १० सेमी

३) ७ सेमी

४) २१ सेमी


४) वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड व केंद्रातून न जाणारा रेषाखंड याला काय म्हणतात?

१) त्रिज्या

२) व्यास

३) जीवा

४) परीघ


५) वर्तुळाचे केंद्र ओळखण्यासाठी कोणते साधन उपयोगी ठरते?

१) कोनमापक

२) पट्टी

३) कंपास

४) स्केल


६) वर्तुळ काढण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते?

१) केंद्र आणि त्रिज्या

२) व्यास आणि परीघ

३) कोन आणि त्रिकोण

४) फक्त केंद्र


७) वर्तुळाचे सर्व व्यास ______ असतात.

१) समान लांबीचे

२) भिन्न लांबीचे

३) त्रिज्येपेक्षा लहान

४) केंद्राशी न जोडलेले


८) वर्तुळातील व्यास व त्रिज्येचे संबंध काय आहे?

१) व्यास = त्रिज्या × २

२) व्यास = त्रिज्या ÷ २

३) व्यास = त्रिज्या + २

४) व्यास = त्रिज्या – २


९) वर्तुळाचा परिघ वाढवायचा असल्यास काय वाढवावे लागते?

१) केंद्र

२) व्यास किंवा त्रिज्या

३) कोन

४) जीवा


१०) वर्तुळाला केंद्रातून जाणारे किती व्यास काढता येतात?

१) एक

२) दोन

३) तीन

४) अनेक

Sunday, 12 October 2025

साप्ताहिक चाचणी क्र. १० चा निकाल

 



यशवंत प्रश्नमाला

साप्ताहिक चाचणी क्रमांक १० चा निकाल

तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि निकाल पहा

मराठी - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १ ते ३ साठी सूचना : सुसंगत परिच्छेद पूर्ण करा.


१) ........ हे भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात.

१) पंडित नेहरू

२) महात्मा गांधी

३) सरदार पटेल

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


२) त्यांनी भारताला ........ या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले.

१) युद्ध

२) अहिंसा आणि सत्याग्रह

३) बंड

४) अन्याय


३) गांधीजींचा जन्म ........ येथे झाला.

१) दिल्ली

२) कोलकाता

३) पोरबंदर

४) लखनौ


प्रश्न ४ ते ६ साठी सूचना : सुसंगत परिच्छेद पूर्ण करा.


४) ........ हे शिक्षणाचे महान पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात.

१) महात्मा गांधी

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

३) कर्मवीर भाऊराव पाटील

४) लोकमान्य टिळक


५) त्यांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ........ ही योजना सुरू केली.

१) कमवा आणि शिका

२) स्वदेशी चळवळ

३) सत्याग्रह

४) स्वच्छ भारत


६) त्यांनी ........ या संस्थेची स्थापना केली.

१) किर्लोस्कर संस्था

२) रेयॉन कंपनी

३) रयत शिक्षण संस्था

४) सह्याद्री विद्यालय


प्रश्न २५ ते २७ साठी सूचना : सुसंगत परिच्छेद पूर्ण करा.


७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील ........ दूर करण्यासाठी संघर्ष केला.

१) अंधश्रद्धा

२) अस्पृश्यता

३) अंधार

४) शिक्षण


८) त्यांनी महाड येथे ........ या तळ्यावरून पाणी घेण्याचा अधिकार मिळवून दिला.

१) रंकाळा

२) चवदार

३) सातारा

४) शाही


९) या आंदोलनातून लोकांना ........ याचा संदेश मिळाला.

१) एकता आणि समानता

२) द्वेष

३) अन्याय

४) अहंकार


साप्ताहिक चाचणी क्रमांक 10




लिंक क्रमांक १

लिंक क्रमांक 2

Thursday, 9 October 2025

बुद्धिमत्ता - गटाशी जुळणारे पद


✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - गटाशी जुळणारे पद*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) धरण, कालवा, विहीर, ?

१) पंपिंग स्टेशन

२) पाऊस

३) तलाव

४) बंधारा


२) मेंढी, शेळी, गाय, ?

१) उंट

२) कुत्रा

३) घोडा

४) म्हैस


३) डोळा, नाक, कान, ?

१) तोंड

२) ओठ

३) जीभ

४) दात


४) हळद, आले, लसूण, ?

१) कोथिंबीर

२) दालचिनी

३) मिरची

४) कांदा


५) भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास, ?

१) समाजशास्त्र

२) जीवशास्त्र

३) इंग्रजी

४) अर्थशास्त्र 


६) सखा, मित्र, सहकारी, ?

१) सवंगडी

२) परिचित

३) प्रतिस्पर्धी

४) सोबती


७) लोणी, तूप, दही, ?

१) ताक

२) दूध

३) चीज

४) पनीर


८) सूर्य, चंद्र, तारे, ?

१) ढग

२) आकाश

३) ग्रह

४) प्रकाश


९) जवाहरलाल नेहरू जयंती, टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, ?

१) प्रजासत्ताक दिन

२) शिवजयंती

३) सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती

४) शिक्षण दिन


१०) रताळे, बीट, हळद, ?

१) लसूण

२) कांदा

३) मुळा

४) कोबी

Tuesday, 7 October 2025

English - Punctuation Marks

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English - Punctuation Marks*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

१) Choose the correct punctuation mark for the given sentence. (दिलेल्या वाक्यासाठी योग्य विरामचिन्ह निवडा.)

Oh no I lost my pen.

१) ?

२) .

३) !

४) ,


२) Which punctuation mark shows surprise or strong feeling? ( आश्चर्य किंवा तीव्र भावना दाखवणारे कोणते विरामचिन्ह आहे? )

१) Full stop

२) Question mark

३) Exclamation mark

४) Comma


३) Which of the following sentences is punctuated correctly? (पुढीलपैकी कोणते वाक्य योग्य विरामचिन्हासह लिहिले आहे?)

१) where are you going ?

२) Where are you going.

३) Where are you going ?

४) Where are you going !


४) Choose the sentence that needs an apostrophe. (ज्या वाक्यात अपोस्ट्रॉफीची गरज आहे ते वाक्य निवडा.)

१) She cant come today

२) She can come today

३) She cannot come today

४) She will come today


५) Which punctuation mark is used to separate items in a list? (यादीतील गोष्टी वेगळ्या दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?)

१) Full stop

२) Comma

३) Apostrophe

४) Colon


६) Choose the correctly punctuated sentence. (योग्य विरामचिन्ह लावलेले वाक्य निवडा.)

१) My brother sister and mother are at home.

२) My brother, sister and mother are at home.

३) My brother sister, and mother are at home.

४) My brother sister and mother are at home


७) What punctuation mark should end the sentence below? (खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह लावावे?)

She is my best friend

१) .

२) !

३) ?

४) ,


८) Which punctuation mark is missing in this sentence? (या वाक्यात कोणते विरामचिन्ह राहिले आहे?)

Its raining heavily.

१) Apostrophe

२) Full stop

३) Comma

४) Exclamation mark


९) How many punctuation marks are used in the given sentence? (दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आहेत?)

“Good morning, students!”

१) One

२) Two

३) Three

४) Four


१०) Choose the incorrect sentence. (चुकीचे वाक्य निवडा.)

१) It’s a beautiful day.

२) I like Mango

, Guava, Papaya and Banana.

३) Are you okay.

४) What a nice surprise!


गणित - आयत त्रिकोण व चौरस बाजू शिरोबिंदू कोन

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - आयत त्रिकोण व चौरस बाजू शिरोबिंदू कोन*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्रश्न १) खालीलपैकी कोणत्या आकृतीत समोरासमोरील व लगतच्या बाजू समान असू शकतात ?

१) आयत

२) चौरस

३) समांतर चतुर्भुज

४) त्रिकोण


प्रश्न २) कोणत्या आकृतीचे समोरासमोरील बाजू आणि सर्व कोन समान असतात ?

१) फक्त चौरस

२) फक्त आयत

३) आयत व चौरस दोन्ही

४) आयत, चौरस व त्रिकोण


प्रश्न ३) त्रिकोणाच्या सर्व बाजू, सर्व कोन व शिरोबिंदू यांची बेरीज किती ?

१) १०

२) १२

३) १९

४) ९


प्रश्न ४) पाच बाजू बंदिस्त असणाऱ्या आकृतीला जास्तीत जास्त किती शिरोबिंदू असतात ?

१) ६

२) ८

३) ५

४) ४


प्रश्न ५) खालीलपैकी कोणत्या आकृतीत सर्व कोन ९० अंशाचे असतात आणि बाजूंची लांबी एकसमान आहे?

१) आयत

२) त्रिकोण

३) चौरस

४) आयत व चौरस दोन्ही


प्रश्न ६) समभुज त्रिकोणात किती बाजू समान असतात ?

१) १

२) २

३) ३

४) एकही नाही.


प्रश्न ७) खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

१) चौरसाचे चारही कोन काटकोन असतात.

२) चौरसाच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात.

३) चार बाजू असणाऱ्या आकृतीला चौरस म्हणतात. 

४) चौरसाला फक्त चारच शिरोबिंदू असतात.


प्रश्न ८) कोणत्या आकृतीला नेहमी तीन बाजू असतात आणि समोरासमोरील कोन वेगवेगळे असू शकतात ?

१) आयत

२) त्रिकोण

३) चौरस

४) पंचकोन


प्रश्न ९) खालीलपैकी बरोबर विधान कोणते ?

अ) आयताच्या लगतच्या बाजू असमान असतात.

ब) चौरसाच्या लगतच्या बाजू समान असतात. 


१) फक्त अ बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) अ व ब दोन्ही बरोबर 

४) अ व ब दोन्ही चुकीचे


प्रश्न १०) आयताच्या सर्व बाजू, सर्व कोन व सर्व शिरोबिंदू यांची बेरीज किती ?

१) १०

२) १२

३) १६

४) २०

Monday, 6 October 2025

मराठी - योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा.

 

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा..*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्र. १) प्रामाणिकपणा ही मनुष्याची सर्वात मोठी ________ असते.

१) अडचण

२) कमकुवतता

३) शक्ती

४) सवय


प्र. २) नदीचे पाणी ________ वाहते.

१) उलटे

२) उतारावरून

३) आकाशात

४) झाडावरून


प्र. ३) ज्ञानाचे खरे सौंदर्य ________ असते.

१) दिखाव्यात

२) व्यवहारात

३) वादात

४) स्पर्धेत


प्र. ४) ज्या झाडाला फळे येतात ते झाड अधिक ________ असते.

१) उंच

२) वाकडे

३) झुकते

४) कोरडे


प्र. ५) “कष्ट करणाऱ्यांना फळ मिळते” या म्हणीतील ‘फळ’ म्हणजे ________.

१) झाडाचे फळ

२) परिश्रमाचे यश

३) खाण्याची वस्तू

४) पिकलेली फळे


प्र. ६) माणूस मोठा त्याच्या ________ होतो.

१) पैशामुळे

२) घरामुळे

३) विचारामुळे

४) कपड्यामुळे


प्र. ७) चांगला मित्र नेहमी आपल्या दुःखात ________ असतो.

१) दूर

२) आनंदी

३) सहभागी

४) व्यस्त


प्र. ८) परीक्षेत यश मिळवण्यासाठी ________ आवश्यक आहे.

१) शिस्त

२) भाग्य

३) तक्रार

४) झोप


प्र. ९) सत्य बोलणारा माणूस नेहमीच ________ असतो.

१) भीत

२) धैर्यवान

३) कपटी

४) निराश


प्र. १०) आईचे प्रेम ________ सारखे असते.

१) समुद्र

२) चंद्र

३) सावली

४) आरसा

साप्ताहिक चाचणी क्रमांक ९ चा निकाल

यशवंत प्रश्नमाला

साप्ताहिक चाचणी क्रमांक ९ चा निकाल

तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि निकाल पहा

Sunday, 5 October 2025

साप्ताहिक चाचणी क्रमांक ९ (विषय - गणित)


✅ यशवंत प्रश्नमाला
✅ साप्ताहिक चाचणी क्र. ९
✅ श्री. संदीप पाटील सर, दुधगांव.
9096320023

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
आजची साप्ताहिक चाचणी क्र. ९ सायंकाळी ६.०० ते ९.०० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

✅ विषय: गणित
✅ घटक: गुणाकार, भागाकार, विभाज्यतेच्या कसोट्या, गुणाकार व भागाकार शाब्दिक उदाहरणे

✅ एकूण गुण: ५०
✅ चाचणीसाठी लिंक: ठिक सायंकाळी ६.०० वाजता सुरू होईल.

✅ महत्वाचे:
चाचणी सुरू करण्यापूर्वी आपला मोबाईल क्रमांक अचूक नोंदवा.
तोच आपला बैठक क्रमांक असेल.
गुण आणि गुणवत्ता यादीतील क्रमांक याच क्रमांकावर आधारित असतील.

📅 निकाल जाहीर:
सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५, सायंकाळी ७.०० वाजता.

#यशवंतप्रश्नमाला #साप्ताहिकचाचणी #गणित #ऑनलाइनटेस्ट #विद्यार्थीउपक्रम

लिंक क्रमांक १

लिंक क्रमांक 2

Saturday, 4 October 2025

English - Names of colours, things, Shapes, objects, vegetables, fruits & games

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English - Names of colours, things, Shapes, objects, vegetables, fruits & games*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) Which one is a flower? (फुल कोणते आहे?)

१) Rose

२) Mango

३) Potato

४) Tomato


प्रश्न २) Which one is not a vegetable? (पुढीलपैकी भाजी नाही ती ओळखा.)

१) Potato

२) Carrot

३) Banana

४) Brinjal


प्रश्न ३) Which is the shape of a coin? (नाण्याचा आकार कोणता असतो?)

१) Square

२) Circle

३) Triangle

४) Rectangle


प्रश्न ४) Which one is a leafy vegetable? (पालेभाजी कोणती आहे?)

१) Spinach

२) Mango

३) Banana

४) Apple


प्रश्न ५) Which one is a fruit? (फळ कोणते आहे?)

१) Tomato

२) Potato

३) Onion

४) Cabbage


प्रश्न ६) Which of the following is a root vegetable? (कंदभाजी कोणती आहे?)

१) Carrot

२) Tomato

३) Guava

४) Brinjal


प्रश्न ७) Which game is played on a board? (बोर्डवर खेळला जाणारा खेळ कोणता?)

१) Chess

२) Cricket

३) Football

४) Kabaddi


प्रश्न ८) Which game needs a bat and ball? (बॅट आणि बॉल लागणारा खेळ कोणता?)

१) Chess

२) Hockey

३) Cricket

४) Carrom


प्रश्न ९) What is the colour of milk? (दुधाचा रंग कोणता असतो?)

१) White

२) Yellow

३) Blue

४) Pink


प्रश्न १०) Which thing is used to tell time? (

वेळ सांगण्यासाठी काय वापरतात?)

१) Clock

२) Chair

३) Book

४) Bag



Friday, 3 October 2025

बुद्धिमत्ता - वेन आकृती

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - वेनआकृती*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) फक्त विमान प्रवासी किती आहेत?

१) १०

२) २

३) ५

४) ६


प्रश्न २) फक्त रेल्वे प्रवासी किती आहेत?

१) ३

२) ६

३) ४

४) ८


प्रश्न ३) फक्त बस प्रवासी किती आहेत?

१) ६

२) ८

३) ५

४) २


प्रश्न ४) सर्व वाहनांनी प्रवास करणारे प्रवासी किती आहेत?

१) ५

२) २

३) ४

४) ६


प्रश्न ५) विमान व रेल्वे प्रवास करतात पण, बस नाही असे किती प्रवासी आहेत?

१) ४

२) २

३) ५

४) ८


प्रश्न ६) रेल्वे व बस दोन्हीचे प्रवासी पण विमान प्रवासी नसलेले किती आहेत?

१) ३

२) ६

३) ८

४) ४


प्रश्न ७) किमान दोन वाहनांचे प्रवासी एकूण किती आहेत?

१) ११

२) १२

३) १३

४) १६


प्रश्न ८) फक्त एकाच वाहनाने प्रवास करणारे एकूण किती आहेत?

१) १९

२) २४

३) १७

४) १५


प्रश्न ९) केवळ विमान व केवळ बस ने प्रवास प्रवासी किती आहेत?

१) १६

२) १४

३) १८

४) १५


प्रश्न १०) फक्त एकाच वाहनाने प्रवास करणारे एकूण प्रवासी किती आहेत ?

१) १६

२) २४

३) २०

४) १४


Thursday, 2 October 2025

बुद्धिमत्ता - दिनदर्शिका


✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - दिनदर्शिका*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) जर १ जानेवारी २०२४ रोजी सोमवार असेल तर ३१ डिसेंबर २०२४ कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) रविवार

४) बुधवार


प्रश्न २) १ जानेवारी २०१८ ला सोमवार असेल तर १ जानेवारी २०१९ ला कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) बुधवार

४) गुरुवार


प्रश्न ३) जर १५ ऑगस्ट २०२१ रोजी रविवार असेल तर २ ऑक्टोबर २०२१ कोणता वार असेल?

१) शनिवार

२) रविवार

३) शुक्रवार

४) सोमवार


प्रश्न ४) एका महिन्यात ३१ दिवस आहेत आणि त्या महिन्याचा पहिला दिवस मंगळवार आहे. तर त्या महिन्याचा शेवट कोणत्या दिवशी होईल?

१) गुरुवार

२) शुक्रवार

३) बुधवार

४) शनिवार


प्रश्न ५) २६ जानेवारी २०२२ रोजी बुधवार होता. तर १५ ऑगस्ट २०२२ ला कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) बुधवार

४) गुरुवार


प्रश्न ६) जर १ मार्च २०१९ रोजी शुक्रवार असेल तर १ मार्च २०२० रोजी कोणता वार असेल?

१) शनिवार

२) रविवार

३) सोमवार

४) शुक्रवार


प्रश्न ७) खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे?

अ) प्रत्येक लीप वर्षात ३६६ दिवस असतात.

ब) ३१ दिवसांचे महिने आठ असतात.

क) प्रत्येक शतकातील पहिले वर्ष नेहमी लीप वर्ष असते.

ड) फेब्रुवारी महिन्यात कधी २८ तर कधी २९ दिवस असतात.

१) फक्त ‘अ’

२) ‘अ’ व ‘ड’

३) ‘ब’ व ‘क’

४) ‘अ’ व ‘ब’


प्रश्न ८) एका महिन्यात ३० दिवस असून त्याचा पहिला दिवस गुरुवार असेल तर त्या महिन्यात किती रविवार येतील?

१) चार

२) पाच

३) तीन

४) सहा


प्रश्न ९) २०२५ मध्ये १ जानेवारी बुधवार असेल तर २६ जानेवारी २०२५ कोणता वार असेल?

१) रविवार

२) सोमवार

३) शनिवार

४) मंगळवार


प्रश्न १०) चुकीचे विधान ओळखा.

अ) प्रत्येक वर्षी ५२ आठवडे असतात.

ब) सर्व महिन्यांत किमान ३० दिवस असतात.

क) लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात.

ड) २००० हे वर्ष लीप वर्ष होते.

१) फक्त ‘ब’

२) ‘अ’ व ‘ड’

३) फक्त ‘क’

४) ‘ब’ व ‘क’

दिनदर्शिका यावर आधारित शैक्षणिक खेळ खेळण्यासाठी येथे क्लिक करा.