Tuesday, 30 September 2025

गणित - कोन व कोनाचे प्रकार

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - कोन व कोनाचे प्रकार*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) एका त्रिकोणात एक लघुकोन, एक काटकोन असेल तर तिसरा कोन कोणता असेल ?

१) लघुकोन

२) काटकोन

३) विशालकोन

४) सरळकोन


प्रश्न २) काटकोनाचे माप किती असते?

१) ३०°

२) ४५°

३) ९०°

४) १८०°


प्रश्न ३) एका सरळ रेषेत तयार होणारा कोन किती अंशांचा असतो?

१) ९०°

२) १८०°

३) २७०°

४) ३६०°


प्रश्न ४) ६०° मापाचा कोन कोणत्या प्रकारात मोडतो?

१) काटकोन

२) लघुकोन

३) विशालकोन

४) सरळकोन


प्रश्न ५) घड्याळात ३ वाजले असता काट्यांमध्ये कोणता कोन तयार होतो?

१) काटकोन

२) लघुकोन

३) विशालकोन

४) सरळकोन


प्रश्न ६) चौकोनाच्या सर्व कोनांचे मापांची बेरीज किती असते?

१) ९०°

२) १८०°

३) ४५°

४) ३६०°


प्रश्न ७) ८९° मापाचा कोन कोणत्या प्रकारचा आहे?

१) काटकोन

२) सरळकोन

३) लघुकोन

४) विशालकोन


प्रश्न ८) ९१° मापाचा कोन म्हणजे —

१) काटकोन

२) सरळकोन

३) लघुकोन

४) विशालकोन


प्रश्न ९) त्रिकोणातील सर्व कोनांची बेरीज किती असते?

१) १८०°

२) ३६०°

३) ९०°

४) २७०°


प्रश्न १०) लघुकोनाचे माप जास्तीत जास्त किती असू शकते ?

१) ९०

२) १८०

३) ९१

४) ८९


Monday, 29 September 2025

गणित - नाणी - नोटा ( रुपये - पैसे )

 

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - नाणी - नोटा ( रुपये - पैसे )*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्रश्न १) १००० पैसे = किती रुपये ?

१) १०० रुपये

२) १ रुपया

३) १० रुपये

४) ५ रुपये


प्रश्न २) ५ रुपये = किती पैसे ?

१) ५० पैसे

२) ५००० पैसे

३) ५५ पैसे

४) ५०० पैसे


प्रश्न ३) ८ रु. ४० पैसे + ५ रु. ६० पैसे = ?

१) १४ रुपये

२) १३ रु. ५० पैसे

३) १५ रु. २० पैसे

४) १४ रु. ५० पैसे


प्रश्न ४) २५ रुपये म्हणजे किती पैसे ?

१) २५० पैसे

२) २५०० पैसे

३) २५ पैसे

४) २५००० पैसे


प्रश्न ५) १०० रुपयांमध्ये २० रु. च्या किती नोटा मिळतील ?

१) १५

२) १०

३) २०

४) ५


प्रश्न ६) राहुलकडे ५० रु. च्या ४ नोटा आणि १० रु. च्या ३ नोटा आहेत. एकूण रुपये किती ?

१) २६० रुपये

२) २३० रुपये

३) २०० रुपये

४) २५० रुपये


प्रश्न ७) संजयकडे असलेल्या ३० रुपयांमध्ये सर्व नाणी २ रुपयांची आहेत. तर त्याच्याकडे किती नाणी आहेत ?

१) ३०

२) ६०

३) १५

४) २०


प्रश्न ८) १५ रु. ५० पैसे – ८ रु. २५ पैसे = ?

१) ७ रु. ५० पैसे

२) ७ रु. २५ पैसे

३) ८ रु. १५ पैसे

४) ७ रु. ३० पैसे


प्रश्न ९) दीड रुपया = किती पैसे ?

१) १५० पैसे

२) ५० पैसे

३) २५ पैसे

४) २५० पैसे


प्रश्न १०) सीमा १२ रु. दराने ३ वही व २ रु. दराने ५ पेन्सिली घेते. तिला दुकानदाराला किती रुपये द्या

वे लागतील ?

१) ३६ रुपये

२) ४६ रुपये

३) ३४ रुपये

४) ४० रुपये


मराठी - संवादावर आधारित प्रश्न

 


✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - संवादावर आधारित प्रश्न*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १ ते ५ साठी सूचना : खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय निवडा. 


"अद्वया, जान्हवी, आराध्या, राजनंदिनी मास्क लावलास ना गं ?"


"हो, हो गं स्वरांजली अजूनही कोरोना आहे ना. मास्क घातला नाही तर धोका होतो." अद्वया म्हणाली.


"पण आपल्याला लस मिळालीय ना?" आराध्या म्हणाली. 


"लस मिळाली तरी हात धुणे आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे." राजनंदिनी म्हणाली. 


"माझी आई नेहमी सांगते, हात नीट धुवून जा आणि गर्दीत उभी राहू नको." जान्हवी म्हणाली.


"शाळेतही शिक्षक वारंवार सांगतात नियम पाळा म्हणून." अद्वया म्हणाली.


"हो खरंच, आपण काळजी घेतली तर आपलं आणि इतरांचं रक्षण होईल." राजनंदिनी म्हणाली. 


"बरोबर आहे, चला आता नियम पाळून शाळेत जाऊ." सर्वजणी एकत्र म्हणाल्या.


प्रश्न १) संवादाची वेळ कोणती आहे ?

१) सकाळ

२) दुपार

३) सायंकाळ

४) रात्र


प्रश्न २) वरील संवादामध्ये जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे ?

१) चार

२) पाच

३) सहा

४) सात


प्रश्न ३) कोरोना रोगावरील कोणते उपाय वरील संवादात सांगितलेले नाहीत ?

१) मास्क वापरणे.

२) गर्दीत उभं राहावे .

३) सॅनिटायझर वापरणे. 

४) लस घेणे. 


प्रश्न ४) वरील संवादात कोणती मैत्रीण शाळेत जाताना सर्वांना मास्क वापरण्यास लक्ष वेधते ?

१) राजनंदिनी

२) स्वरांजली

३) अद्वया

४) जान्हवी


प्रश्न ५) संवादानुसार, मुलींनी कोरोना प्रतिबंधक उपाय पाळल्यास काय होईल?

१) काही फरक पडणार नाही.

२) फक्त स्वतः सुरक्षित राहतील.

३) स्वतःसह इतरांचं रक्षणही होईल.

४) फक्त शाळेतच सुरक्षित राहतील.


Sunday, 28 September 2025

साप्ताहिक चाचणी क्रमांक आठ निकाल


यशवंत प्रश्नमाला

साप्ताहिक चाचणी क्रमांक ८ चा निकाल

तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि निकाल पहा

साप्ताहिक सराव चाचणी क्रमांक 8

लिंक क्रमांक १ लिंक क्रमांक 2

Saturday, 27 September 2025

बुद्धिमत्ता - दिनदर्शिका



✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - दिनदर्शिका*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) २ जानेवारी २०२३ ला सोमवार होता. तर २६ जानेवारी २०२३ (प्रजासत्ताक दिन) कोणत्या दिवशी आला?

१) मंगळवार

२) गुरुवार

३) शुक्रवार

४) गुरुवार


२) जर १ मे २०१६ रोजी रविवार असेल तर १ मे २०१७ ला कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) बुधवार

४) रविवार


३) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) एका वर्षात किमान ५२ रविवार असतात.

ब) ३० दिवसांचे महिने चारच असतात.

क) २००४ हे वर्ष लीप वर्ष होते.

ड) प्रत्येक शतकातील पहिले वर्ष नेहमी लीप वर्ष असते.


१) फक्त ‘अ’

२) ‘अ’ व ‘क’

३) ‘ब’ व ‘ड’

४) ‘अ’, ‘ब’ व ‘क’



४) एखाद्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी सोमवार असेल तर २ ऑक्टोबरला कोणता वार असेल?

१) रविवार

२) शनिवार

३) सोमवार

४) बुधवार


५) २०२० सालची सुरुवात बुधवारी झाली असेल तर त्या वर्षीचा शेवट कोणत्या दिवशी होईल?

१) गुरुवार

२) शुक्रवार

३) बुधवार

४) शनिवार


६) राहुलचा जन्म १ मार्च २००४ रोजी झाला. तो दिवस सोमवार होता. तर १ मार्च २००५ ला कोणता वार होता?

१) सोमवार

२) मंगळवार

३) बुधवार

४) गुरुवार


७) एखाद्या महिन्यात ३० दिवस असतील आणि त्याचा पहिला दिवस रविवार असेल तर त्या महिन्यात किती शुक्रवार येतील?

१) चार

२) पाच

३) तीन

४) सहा


८) २६ जून २०२५ रोजी गुरुवार असेल तर त्याच वर्षी २ ऑक्टोबरला कोणता वार असेल?

१) बुधवार

२) गुरुवार

३) शुक्रवार

४) शनिवार


९) २०१९ मध्ये १५ ऑगस्ट गुरुवारी आला. तर त्याच वर्षी २ ऑक्टोबर कोणत्या दिवशी आला?

१) बुधवार

२) मंगळवार

३) गुरुवार

४) शुक्रवार


१०) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ) २८ दिवसांचा महिना फेब्रुवारीच असतो.

ब) प्रत्येक ४ वर्षांनी लीप वर्ष येते.

क) ३१ दिवसांचे सात महिने असतात.

ड) १ जानेवारी आणि ३१ डिसेंबर नेहमी एकाच वाराला येतात.

१) फक्त ‘अ’

२) ‘अ’ व ‘ड’

३) फक्त ‘ड’

४) ‘ब’ व ‘क’


Friday, 26 September 2025

बुद्धिमत्ता - दिशा

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - दिशा*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) स्नेहा उत्तर दिशेकडे तोंड करून उभी आहे. तिने उजवीकडे काटकोनात वळण घेतले. आता तिची दिशा कोणती असेल?

१) पूर्व

२) पश्चिम

३) दक्षिण

४) उत्तर


२) एक व्यक्ती दक्षिणेकडे ५ कि.मी. चालत गेला. मग उजवीकडे वळून ३ कि.मी. गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून ५ कि.मी. गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल?

१) ३ कि.मी.

२) ५ कि.मी.

३) ७ कि.मी.

४) १० कि.मी.


३) सकाळी १० वाजता सूर्यप्रकाश घराच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून आत येत असेल तर घराचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

१) उत्तर

२) पूर्व

३) पश्चिम

४) दक्षिण


४) राहुल उत्तर दिशेकडे चालत आहे. त्याने सलग दोन वेळा उजवीकडे काटकोनात वळण घेतले. आता तो कोणत्या दिशेला चालत असेल?

१) दक्षिण

२) पश्चिम

३) उत्तर

४) पूर्व


५) प्रणव पूर्वेकडे पाहत आहे. त्याने प्रथम डावीकडे वळण घेतले, मग पुन्हा डावीकडे वळण घेतले, आणि नंतर उजवीकडे वळण घेतले. आता तो कोणत्या दिशेला पाहत असेल?

१) उत्तर

२) पश्चिम

३) दक्षिण

४) पूर्व



६) सकाळी सूर्याच्या दिशेला तोंड करून उभा असलेला मनोज डावीकडे वळला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

१) उत्तर

२) दक्षिण

३) पश्चिम

४) पूर्व


७) एका चौकात उभा असलेला विजय पश्चिमेकडे पाहत आहे. त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

१) उत्तर

२) पूर्व

३) दक्षिण

४) पश्चिम


८) सीमा दक्षिण दिशेला १२ मीटर चालली. नंतर उजवीकडे वळून ९ मीटर चालली. मग डावीकडे वळून ४ मीटर चालली. तर ती मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?

१) आग्नेय

२) नैऋत्य

३) ईशान्य

४) वायव्य


९) पूर्व व दक्षिण यांच्या मधली उपदिशा कोणती?

१) ईशान्य

२) वायव्य

३) आग्नेय

४) नैऋत्य


१०) रोहन दक्षिणेकडे पाहत होता. त्याने प्रथम उजवीकडे वळण घेतले, मग पुन्हा उजवीकडे वळण घेतले, आणि शेवटी डावीकडे वळण घेतले. आता तो कोणत्या दिशेला पाहत असेल?

१) पश्चिम

२) उत्तर

३) पूर्व

४) दक्षिण


Thursday, 25 September 2025

Animal & Birds Name

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *Animal & Birds Name

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) Which bird is known for imitating human voice?

(माणसाचा आवाज काढणारा पक्षी कोणता?)

१) Crow

२) Parrot

३) Pigeon

४) Peacock


२) Which insect makes honey?

(मध कोणता कीटक तयार करतो?)

१) Ant

२) Mosquito

३) Honeybee

४) Butterfly


३) Choose the option that does not fit the group.

(Dog, Cat, Cow, Tiger – यामधला गटात न बसणारा पर्याय निवडा.)

१) Dog

२) Cat

३) Cow

४) Tiger


४) Identify the national bird of India.

(भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?)

१) Peacock

२) Crow

३) Sparrow

४) Parrot


५) Which of the following is a reptile?

(खालीलपैकी सर्पवर्गीय प्राणी कोणता?)

१) Crocodile

२) Tiger

३) Frog

४) Cow


६) Cow : Calf :: Cat : -----

(गाय : वासरू :: मांजर : -----)

१) Cub

२) Kitten

३) Puppy

४) Foal


७) Which animal is known as the ship of the desert?

(वाळवंटाची जहाज म्हणून कोणाला ओळखले जाते?)

१) Camel

२) Horse

३) Donkey

४) Elephant


८) What is the word for Peacock in Marathi?

(Peacock म्हणजे काय?)

१) मोर

२) घुबड

३) कबूतर

४) बगळा


९) Choose the pet animal.

(पाळीव प्राणी निवडा.)

१) Rabbit

२) Fox

३) Tiger

४) Wolf


१०) Which of the following animals can 

fly?

(खालीलपैकी कोणता प्राणी उडू शकतो?)

१) Bat

२) Cat

३) Dog

४) Elephant


Wednesday, 24 September 2025

गणित - दिनदर्शिका महत्त्वाचे दिवस

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - दिनदर्शिका महत्त्वाचे दिवस*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

१) १४ एप्रिल

२) १ मे

३) ५ जून

४) २६ जून


२) शाहू महाराज जयंती कोणत्या तारखेला असते?

१) २६ जून

२) १९ फेब्रुवारी

३) ५ सप्टेंबर

४) २७ फेब्रुवारी


३) एका सामान्य वर्षात किती दिवस असतात?

१) ३६६

२) ३६४

३) ३६५

४) ३६७


४) लीप वर्षा बाबत खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता ?

१) ५२ आठवडे व १ दिवस

२) ५२ आठवडे व २ दिवस

३) ३६६ दिवस

४) २९ फेब्रुवारी


५) खालीलपैकी कोणत्या दिवशी “मराठी भाषा दिन” साजरा केला जातो?

१) २७ फेब्रुवारी

२) २८ फेब्रुवारी

३) १९ फेब्रुवारी

४) ३ जानेवारी


६) “राष्ट्रीय विज्ञान दिन” कधी असतो?

१) २३ जानेवारी

२) ८ मार्च

३) २८ फेब्रुवारी

४) १४ एप्रिल


७) वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

१) १५ ऑक्टोबर

२) १४ नोव्हेंबर

३) ८ सप्टेंबर

४) १ जुलै


८) खालीलपैकी कोणता दिवस ऑक्टोबर महिन्यात येतो?

१) क्रांतिदिन

२) शिक्षक दिन

३) महात्मा गांधी जयंती

४) कृषी दिन


९) “सावित्रीबाई फुले जयंती” कधी असते?

१) ६ जानेवारी

२) ३ जानेवारी

३) १२ जानेवारी

४) १९ फेब्रुवारी


१०) नाताळ सण कोणत्या तारखेला साजरा केला


 जातो?

१) १४ नोव्हेंबर

२) ६ डिसेंबर

३) २५ डिसेंबर

४) १ जानेवारी

Monday, 22 September 2025

गणित - दिनदर्शिका

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - दिनदर्शिका*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) जर १ जानेवारी २०२५ रोजी बुधवार असेल, तर २६ जानेवारी २०२५ रोजी कोणता वार येईल?

१) शुक्रवार

२) रविवार

३) सोमवार

४) शनिवार


२) खालीलपैकी कोणत्या महिन्यात ३१ दिवस नसतात ?

१) ऑक्टोबर

२) एप्रिल

३) डिसेंबर

४) जुलै


३) एका लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?

१) २८

२) २७

३) २९

४) ३०


४) १० ऑगस्टला मंगळवार असेल तर २४ ऑगस्टला कोणता वार असेल?

१) सोमवार

२) मंगळवार

३) बुधवार

४) गुरुवार


५) खालीलपैकी गटात न बसणारा महिना ओळखा.

१) कार्तिक

२) चैत्र

३) जुलै

४) फाल्गुन


६) २ ऑक्टोबर २०२४ रोजी बुधवार असेल, तर २ नोव्हेंबर २०२४ रोजी कोणता वार असेल?

१) शनिवार

२) रविवार

३) सोमवार

४) गुरुवार


७) जर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन शुक्रवार असेल, तर त्याच वर्षी ५ सप्टेंबर शिक्षकदिन कोणत्या वाराला येईल?

१) सोमवार

२) शुक्रवार

३) रविवार

४) शुक्रवार


८) ३० जून नंतर कोणता दिवस येईल?

१) ३१ जून

२) २ जुलै 

३) ३ जुलै

४) १ जुलै


९) १ मे हा महाराष्ट्र दिन सोमवार असेल तर त्या वर्षी १ ऑक्टोबर ला कोणता वार असेल ?

१) सोमवार

२) बुधवार

३) गुरुवार

४) रविवार


१०) २०२८ या वर्षाची सुरुवात सोमवारने झाली. तर त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाच वेळा

 येणारा वार कोणता ?

१) सोमवार

२) शुक्रवार 

३) बुधवार

४) गुरुवार


मराठी - म्हणी

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - म्हणी*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) 'आगीतून उठून फुफाट्यात' या म्हणीचा अर्थ निवडा.

१) मोठ्या संकटातून सुटका होणे.

२) लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.

३) संकट टाळण्यासाठी धाडस करणे.

४) संकटाकडे दुर्लक्ष करणे.


२) 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' या म्हणीचा योग्य अर्थ काय?

१) दुसऱ्याला चुकीचे ठरवणे.

२) सर्वांचे ऐकून शेवटी स्वतःच्या विचाराने वागणे.

३) दुसऱ्याचा सल्ला नेहमी नाकारणे.

४) सर्वांना खूश ठेवण्यासाठी स्वतःला विसरणे.


३) प्रसंग –

शंकर गरजेच्या वेळी मदत करतो, पण फायदा झाला की लोक त्याला विसरतात.

योग्य म्हण निवडा.

१) गरज सरो वैद्य मरो.

२) दाम करी काम.

३) नाव मोठे लक्षण खोटे.

४) गरजवंताला अक्कल नसते.


४) 'करावे तसे भरावे' या म्हणीचा अर्थ निवडा.

१) प्रत्येक कामासाठी पैसा लागतो.

२) वाईट कृत्याचे फळ वाईटच असते.

३) नशिबाने जे घडायचे ते घडते.

४) चांगले काम केले की सुख मिळते.


५) 'दगडापेक्षा वीट मऊ' या म्हणीचा योग्य अर्थ काय?

१) मोठ्या संकटापेक्षा लहान संकट बरे वाटणे.

२) मोठ्या संकटासाठी धीर सोडणे.

३) लहान संकट दुर्लक्षित करणे.

४) लहान माणसाला मोठे मानणे.


६) खालील अर्थावरून योग्य म्हण निवडा –

"कष्टाशिवाय यश मिळत नाही."

१) प्रयत्नांती परमेश्वर.

२) रोज मरे त्याला कोण रडे.

३) देश तसा वेश.

४) नाव मोठे लक्षण खोटे.


७) प्रसंग –

रामकाकांनी खूप गाजावाजा केला, पण काम झालेच नाही.

योग्य म्हण निवडा.

१) गरजवंताला अक्कल नसते.

२) गर्जेल तो पडेल काय?

३) गाव करी ते राव न करी.

४) थेंबे थेंबे तळे साचे.


८) 'तहान लागल्यावर विहीर खणणे' या म्हणीचा अर्थ निवडा.

१) संकट आल्यावर धीर धरणे.

२) गरज भासल्यावर वस्तूची शोधाशोध करणे.

३) आधीच उपाययोजना करणे.

४) दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकणे.


९) 'दुरून डोंगर साजरे' या म्हणीचा अर्थ काय?

१) जवळच्या गोष्टी नेहमी चांगल्या वाटतात.

२) दूरच्या गोष्टी नेहमी मोहक वाटतात, पण जवळ गेल्यावर खरे रूप दिसते.

३) दूर राहिलेल्या व्यक्तीला नेहमी आदर मिळतो.

४) दुसऱ्याचे यश नेहमी मोठे वाटते.


१०) प्रसंग –

मी रोज थोडे थोडे पैसे साठवले. काही महिन्यांनी मोठी रक्कम जमली.

योग्य म्हण निवडा.

१) थेंबे थेंबे तळे साचे.

२) रात्र थोडी सोंगे फार.

३) पाचामुखी परमेश्वर.

४) काकेत कळसा नि गावाला वळसा.


यशवंत प्रश्नमाला साप्ताहिक चाचणी क्रमांक ७ निकाल

 

Saturday, 20 September 2025

English - Body Parts

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English - Body Parts *


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) Which organ is used to wear a bracelet?

(कंगन घालण्यासाठी कोणता अवयव लागतो?)

१) Neck

२) Wrist

३) Leg

४) Ear


प्रश्न २) Find the odd word.

(वेगळा शब्द शोधा.)

१) Nose

२) Ear

३) Eye

४) Stomach


प्रश्न ३) Which organ helps us to pump blood?

(शरीरात रक्त पंप करण्याचे काम कोणता अवयव करतो?)

१) Heart

२) Lungs

३) Brain

४) Stomach


प्रश्न ४) Use the correct word.

(योग्य शब्द निवडून वापरा.)

Taste – Tongue :: Smell – ?

१) Ear

२) Eye

३) Nose

४) Hand


प्रश्न ५) Which body part helps us to see?

(पाहण्यासाठी कोणता अवयव मदत करतो?)

१) Nose

२) Eye

३) Ear

४) Tongue


प्रश्न ६) If Hand = Palm Then Foot = ?

(हात = तळहात तर पाय = ?)

१) Toe

२) Sole

३) Heel

४) Knee


प्रश्न ७) Find the correct group.

(योग्य गट शोधा.)

१) Ear, Eye, Nose

२) Finger, Knee, Chin

३) Stomach, Brain, Hand

४) Leg, Palm, Elbow


प्रश्न ८) Which organ controls the whole body?

(संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा अवयव कोणता?)

१) Heart

२) Brain

३) Stomach

४) Nose


प्रश्न ९) Find the wrong pair.

(चुकीची जोडी शोधा.)

१) Eye – See

२) Nose – Smell

३) Hand – Hear

४) Tongue – Taste


प्रश्न १०) Choose the word that matches the group.

(गटाशी जुळणारा शब्द निवडा.)

Hair, Forehead, Ear

१) hand

२) Nose

३) Nail

४) Knee

Friday, 19 September 2025

बुद्धिमत्ता - कूटप्रश्न (रांगेतील स्थान )

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *बुद्धिमत्ता - कूट प्रश्न रांगेतील स्थान*

****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 
****************************


प्रश्न १) एका रांगेत २७ विद्यार्थी आहेत. तर मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कोणता असेल?

१) १५

२) १३

३) १२

४) १४


प्रश्न २) एका रांगेत राधा डावीकडून १० वी व उजवीकडून १५ वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत?

१) २५

२) २४

३) २३

४) २६


प्रश्न ३) एका रांगेत ३५ विद्यार्थी आहेत. डावीकडून ९ व्या क्रमांकावर उभा असलेल्या रमेशचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल?

१) २८

२) २६

३) २५

४) २७


प्रश्न ४) एका रांगेत पुढून १८ व्या व मागून १५ व्या क्रमांकावर विजय उभा आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

१) ३३

२) ३२

३) ३१

४) ३४


प्रश्न ५) एका रांगेत समोरून ६ वी मुलगी व मागून ८ वा मुलगा यांच्या मध्ये १० मुले उभी आहेत. तर रांगेतील एकूण मुले किती?

१) २४

२) २५

३) २३

४) २६


प्रश्न ६) एका रांगेत २० विद्यार्थी आहेत. डावीकडून ७ वा विद्यार्थी निवडला. त्याच्या उजवीकडून कितवा क्रमांक असेल?

१) १२

२) १३

३) १४

४) १५


प्रश्न ७) संजयचा डावीकडून व उजवीकडून क्रमांक समान आहे. जर तो डावीकडून १६ वा असेल, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

१) ३०

२) ३२

३) ३३

४) ३१


प्रश्न ८) एका रांगेत समोरून ९ वी व मागून ११ वी मुलगी यांच्या मध्ये ७ मुले आहेत. तर रांगेतील एकूण विद्यार्थी किती?

१) २६

२) २७

३) २५

४) २८


प्रश्न ९) एका मैदानात कवायतीसाठी जितक्या रांगा आहेत तितकीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण विद्यार्थी ४९ असतील, तर एका रांगेतील मुलांची संख्या किती?

१) ९

२) ८

३) ६

४) ७


प्रश्न १०) एका रांगेत गीता डावीकडून ११ वी आहे. तिच्या मागे मिना उभी आहे. मीनापासून ९ व्या क्रमांकावर शेवटचा विद्यार्थी आहे. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

१) १९

२) २०

३) २१

४) २२


Thursday, 18 September 2025

बुद्धिमत्ता - समसंबंध (संख्या)

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - समसंबंध (संख्या)*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न : खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून शोधा.


प्रश्न १) २७ : ७२ :: ८१ : ?

१) १२८

२) १८

३) १८१

४) ९९


प्रश्न २) २७ : ९ :: १२५ : ?

१) २५

२) ५

३) ५०

४) ३५


प्रश्न ३) ४५ : ५४ :: ८९ : ?

१) ८९

२) ९८

३) ८८

४) ७९


प्रश्न ४) ६ : ७२ :: ९ : ?

१) ९०

२) ८१

३) १०८

४) ७२


प्रश्न ५) १५ : २२५ :: १३ : ?

१) १६९

२) १६९०

३) २१९

४) २७९


प्रश्न ६) ३ : १५ :: ५ : ?

१) २०

२) २५

३) ३०

४) ३५


प्रश्न ७) ४९ : ७ :: १०० : ?

१) २०

२) २५

३) १०

४) १५


प्रश्न ८) २४ : ४२ :: ३६ : ?

१) ४८

२) ६३

३) ७२

४) ६६


प्रश्न ९) ७ : ९१ :: ९ : ?

१) ५२

२) ९८

३) १०४

४) ११७


प्रश्न १०) ३२ : ९४ :: २३ : ?

१) ३५

२) ३२

३) ३४

४) ४९


Wednesday, 17 September 2025

कालमापन (घड्याळ)

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *गणित - कालमापन (घड्याळ)*

****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 
****************************

प्रश्न १) सकाळी ९ वा. ४५ मि. शाळा सुरू झाली आणि दुपारी ३ वा. १५ मि. सुटली तर शाळा किती वेळ चालली?
१) ५ ता. १५ मि.
२) ५ ता. ३० मि.
३) ६ ता. ३० मि.
४) ६ ता. १५ मि.

प्रश्न २) राजू दुपारी १ वा. २० मि. घरातून निघाला व संध्याकाळी ५ वा. ५० मि. परतला. तो बाहेर किती वेळ होता?
१) ४ ता. २० मि.
२) ३ ता. ३० मि.
३) ४ ता. ३० मि.
४) ५ ता. ३० मि.

प्रश्न ३) ९ मिनिटे = ? सेकंद
१) ५४०
२) ४९०
३) ४५०
४) ५५०

प्रश्न ४) २ ता. २५ मि. + १ ता. ५० मि. = ?
१) ३ ता. ७५ मि.
२) ४ ता. १५ मि.
३) ४ ता. ०५ मि.
४) ३ ता. १५ मि.

प्रश्न ५) एक दिवसात किती मिनिटे असतात?
१) १४४०
२) १३८०
३) १६८०
४) १२४०

प्रश्न ६) २४ ताशी घड्याळाप्रमाणे २१ वा. १० मि. झाले तर १२ ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजले असतील?
१) ९ : १०
२) ८ : १०
३) ७ : १०
४) ११ : १०

प्रश्न ७) पावणे नऊ वाजता मिनिट काटा कितीवर असेल?
१) ९
२) ३
३) ६
४) ७

प्रश्न ८) रवि एका मिनिटात १५ दोरीच्या उड्या मारतो. तर १२ मिनिटांत तो किती उड्या मारील?
१) १८०
२) १६५
३) १५०
४) २००

प्रश्न ९) घड्याळात काटकोन किती वेळा होतो?
१) ११ वेळा
२) २२ वेळा
३) २ वेळा
४) ४ वेळा

प्रश्न १०) मध्यान्होतर ७ वा. ४५ मि. = ? 
१) १९ वा. ४५ मि.
२) २० वा. १५ मि.
३) २१ वा. १५ मि.
४) १८ वा. ४५ मि.

Tuesday, 16 September 2025

गणित - मापन (धारकता)

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - मापन - (धारकता)*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) ४७५० मिली = लीटर मिली?

१) ४ ली ७५० मिली

२) ४७ ली ५० मिली

३) ४५० ली ७५० मिली

४) ४७ ली ५०० मिली


प्रश्न २) ८२५० मिली किती?

१) ८ ली २५० मिली

२) ८२५ ली ० मिली

३) ८२ ली ५० मिली

४) ८ ली ५०० मिली


प्रश्न ३) ९००० मिली = किती लीटर?

१) ९ लीटर

२) ९० लीटर

३) ९०० लीटर

४) ९००० लीटर


प्रश्न ४) पुढीलपैकी योग्य रूपांतर ओळखा.

१) साडेसहा लीटर = ६५०० मिली

२) सव्वासात लीटर = ७७५ मिली

३) पावणे दोन लीटर = १७५० मिली

४) सव्वा तीन लीटर = ३२५० मिली


प्रश्न ५) १२ लीटर म्हणजे किती मिली?

१) १२००

२) १२०००

३) १२१०

४) १२,००००


प्रश्न ६) ८ ली ८०० मिली + ७ ली ३०० मिली = ?

१) १६ ली १०० मिली

२) १५ ली १०० मिली

३) १६ ली १००० मिली

४) १५ ली ३०० मिली


प्रश्न ७) ५०५० मिली किती?

१) ५० ली ५० मिली

२) ५ ली ५० मिली

३) ५ ली ५०० मिली

४) ५ ली ५ मिली


प्रश्न ८) चुकीचा पर्याय ओळखा.

१) २ लीटर = २००० मिली

२) साडेतीन लीटर = ३५०० मिली

३) १० लीटर = १००० मिली

४) २५० मिली = पाव लीटर


प्रश्न ९) एका शेतकऱ्याने ३ सव्वा लीटर आणि दुसऱ्याने २ सव्वा लीटर दूध दिले. दोघांनी मिळून किती दूध दिले?

१) ५ लीटर

२) ५ लीटर ५०० मिली

३) ६ लीटर

४) ६ लीटर ५०० मिली


प्रश्न १०) सव्वादहा लीटर = किती मिली?

१) १०२५ मिली

२) १०,२५० मिली

३) १२५० मिली

४) १०,०५० मिली


Monday, 15 September 2025

मराठी - वाक्प्रचार


✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - वाक्प्रचार*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) "धाडस करणे" या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

१) पाय उचलणे

२) छाती ठोकणे

३) डोळे चोळणे

४) पोटशूळ उठणे


प्रश्न २) वाक्प्रचार आणि अर्थ यांची अयोग्य जोडी निवडा.

१) कानाला खडा लावणे – पुन्हा ती चूक न करणे

२) अंगावर येणे – मदत करणे

३) पाय अडकणे – अडचणीत येणे

४) डोळे दिपणे – भांबावून जाणे


प्रश्न ३) "मेहनत घेणे" या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

१) कंबर कसणे

२) हात उगारणे

३) कानावर घेणे

४) पोटशूळ येणे


प्रश्न ४) "खूप रागावणे" या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

१) अंगावर येणे

२) पाय मोडणे

३) कानावर घेणे

४) मन रमणे


प्रश्न ५) खालीलपैकी समानार्थी वाक्प्रचार निवडा.

१) कानाडोळा करणे = दुर्लक्ष करणे

२) कंबर कसणे = घाबरणे

३) कान उघडे ठेवणे = झोप घेणे

४) डोळ्यात तेल घालणे = हसू आवरणे


प्रश्न ६) "पळ काढणे" या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

१) आड येणे

२) अंग चोरणे

३) हात दाखवणे

४) मन मारणे


प्रश्न ७) वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ चुकीचाअसलेला पर्याय कोणता?

१) कान उघडे ठेवणे – लक्षपूर्वक ऐकणे

२) डोळ्यांत तेल घालणे – सावध राहणे

३) अंग चोरणे – जबाबदारी घेणे

४) चहूबाजूंनी घेरणे – अडचणीत अडकणे


प्रश्न ८) काम टाळणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

१) ढेपाळून पडणे

२) हात झटकणे

३) डोळे वटारणे

४) हृदय उघडणे


प्रश्न ९) खालील वाक्यात गाळलेली जागा भरा –

शिक्षकांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट अभ्यास करण्याची ____ दिली.

१) आहुती दिली

२) कान उघडे ठेवले

३) ताकीद दिली

४) शिफारस केली


प्रश्न १०) खालील वाक्यात गाळलेली जागा भरा –

त्याने इतरांवर दोष टाकून स्वतःची _

___.

१) कंबर खचवली

२) सुटका करून घेतली

३) तोंड झाकले

४) आहुती दिली


साप्ताहिक चाचणी क्र. ६ निकाल


Saturday, 13 September 2025

English - Dictionary skills

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English - Dictionary skills*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) Find the alphabetically wrong set of words.

(वर्णानुक्रमे चुकीचा गट शोधा.)

१) cat, cup, dog

२) fan, fig, fox

३) kite, king, key

४) rat, red, run


प्रश्न २) Which word comes before the word school in the dictionary?

(शब्दकोशात school या शब्दापूर्वी कोणता शब्द येईल?)

१) science

२) score

३) sea

४) scanner 


प्रश्न ३) After the word "teacher" which entry is in the dictionary?

(teacher नंतर कोणती नोंद असेल?)

१) teaching

२) tea

३) team

४) tear


प्रश्न ४) Where to find the word zebra in the dictionary?

(zebra हा शब्द कोठे येईल?)

१) before yellow

२) after zero

३) before x-ray

४) after yard


प्रश्न ५) Alphabetically which is the 2nd word in the dictionary?

(खालीलपैकी दुसरा कोणता शब्द येईल?)

१) apple

२) ant

३) arm

४) air


प्रश्न ६) Where to find the word lotus?

(lotus हा शब्द कोठे सापडेल?)

१) after lion

२) before lamp

३) before leaf

४) after love


प्रश्न ७) Alphabetically what will be the last month?

(वर्णानुक्रमे शेवटचा महिना कोणता येईल?)

१) June

२) September

३) October

४) December


प्रश्न ८) Choose the word that is alphabetically second.

(वर्णानुक्रमे दुसरा शब्द कोणता?)

book, bag, ball, bat

१) book

२) bag

३) ball

४) bat


प्रश्न ९) Choose the word that is alphabetically second.

(वर्णानुक्रमे दुसरा शब्द कोणता?)

tree, toy, tap, top

१) tree

२) toy

३) tap

४) top


प्रश्न १०) Choose the word that is alphabetically second.

(वर्णानुक्रमे

 दुसरा शब्द कोणता?)

milk, mango, mouse, man

१) milk

२) mango

३) mouse

४) man

Thursday, 11 September 2025

बुद्धिमत्ता - समसंबंध

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - समसंबंध*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्रश्न १) वाळवंट : वाळू :: सागर : ?

१) झाडे

२) पाऊस

३) पाणी

४) टेकड्या


प्रश्न २) डॉक्टर : रुग्ण :: वकील : ?

१) पोलिस

२) पक्षकार

३) न्यायालय

४) शिक्षा


प्रश्न ३) पंख : पक्षी :: पर : ?

१) कीटक

२) साप

३) मासा

४) माकड


प्रश्न ४) पुणे : महाराष्ट्र :: लखनौ : ?

१) गुजरात

२) उत्तरप्रदेश

३) बिहार

४) राजस्थान


प्रश्न ५) दूध : लोणी :: ऊस : ?

१) साखर

२) गूळ

३) रस

४) शरबत


प्रश्न ६) शिवाजी महाराज : गनिमी कावा :: गांधीजी : ?

१) असहकार

२) स्वातंत्र्य

३) सत्याग्रह

४) चरखा


प्रश्न ७) रत्नागिरी : हापूस :: नाशिक : ?

१) द्राक्ष

२) संत्रे

३) डाळिंब

४) केळी


प्रश्न ८) शिवाजी महाराज : स्वराज्य :: गांधीजी : ?

१) असहकार

२) स्वातंत्र्य

३) सत्याग्रह

४) चरखा


प्रश्न ९) कवी : कविता :: चित्रकार : ?

१) गाणे

२) रंग

३) चित्र

४) गोष्ट


प्रश्न १०)

 दिवस : सूर्य :: रात्र : ?

१) अंधार

२) चंद्र

३) तारे

४) प्रकाश



बुद्धिमत्ता - नातेसंबंध

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - नातेसंबंध*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) एका मुलीकडे पाहून अरुण म्हणाला, "ती माझ्या आईच्या मुलीची बहीण आहे." तर ती मुलगी अरुणची कोण?

१) बहीण

२) चुलतबहिण

३) मावसबहिण

४) आत्या


प्रश्न २) रोहनच्या आईच्या भावाची मुलगी कविता आहे. तर कविता व रोहन यांचे नाते कोणते?

१) आतेबहिण

२) मामेबहिण

३) मावसबहिण

४) चुलतबहिण


प्रश्न ३) सुनीलच्या वडिलांची बहीण ही राजेशची आई आहे. तर सुनील व राजेश यांचे नाते कोणते?

१) मावसुभाऊ

२) मामेभाऊ

३) आतेभाऊ

४) चुलतभाऊ


प्रश्न ४) एका स्त्रीकडे पाहून सीमा म्हणाली, "ती माझ्या पतीच्या बहिणीची आई आहे." तर ती स्त्री सीमेशी कोण?

१) सासू

२) मावशी

३) काकी

४) आत्या


प्रश्न ५) माझ्या आईच्या भावाच्या मुलाच्या बहिणीचे माझ्याशी नाते कोणते?

१) मामी

२) बहीण

३) मामेबहीण

४) आत्या


प्रश्न ६) रमेशने एका मुलाकडे बोट दाखवत सांगितले, "तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा आहे." तर तो मुलगा रमेशचा कोण?

१) मुलगा

२) भाऊ

३) पुतण्या

४) भाचा


प्रश्न ७) संजयच्या मुलीची आई व सचिनच्या मुलाची आई या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तर संजयची मुलगी व सचिनचा मुलगा यांचे नाते कोणते?

१) आतेभाऊ-बहिण

२) मामेभाऊ-बहिण

३) मावसभाऊ-बहिण

४) चुलतभाऊ-बहिण


प्रश्न ८) एका मुलाकडे बोट दाखवत रमा म्हणाली, "तो माझ्या आईच्या वडिलांचा नातू आहे." तर तो मुलगा रमाचा कोण?

१) चुलतभाऊ

२) मावसभाऊ

३) भाऊ

४) सर्व पर्याय चुकीचे


प्रश्न ९) सुनीलच्या पत्नीची मुलगी अंजली आहे. तर अंजली सुनीलशी काय लागते?

१) बहीण

२) पुतणी

३) मुलगी

४) मावसबहिण


प्रश्न १०) एका दांपत्याला दोन मुलगे व दोन मुली आहेत. त्यातील एका मुलीचे लग्न होऊन तिला एक मूल झाले. कुटुंबात एकूण किती सदस्य असतील?

१) ६

२) ७

३) ५

४) ९



Wednesday, 10 September 2025

मापन वजन या घटकावर आधारित शैक्षणिक खेळ/गेम

 

मापन - वजन (मराठी गेम)

मापन - वजन

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - मापन - (वजन)*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


प्रश्न १) ५ कि.ग्रॅ. ७५० ग्रॅम = किती ग्रॅम ?

१) ५०७०

२) ५७००

३) ५०७५

४) ५७५०


प्रश्न २) ४८०० ग्रॅम = किती कि.ग्रॅ. ?

१) ८ कि.ग्रॅ. ४०० ग्रॅम

२) ४८ कि.ग्रॅ.

३) ४ कि.ग्रॅ. ८०० ग्रॅम

४) ४०८० ग्रॅम


प्रश्न ३) सव्वा कि.ग्रॅ. = किती ग्रॅम ?

१) १२५०

२) २२५०

३) २१२५

४) ११२५


प्रश्न ४) २ कि.ग्रॅ. ६०० ग्रॅम + १ कि.ग्रॅ. ४५० ग्रॅम = ?

१) ४०५० ग्रॅम

२) ३ कि.ग्रॅ. ९५० ग्रॅम

३) ३९५० ग्रॅम

४) ३ कि.ग्रॅ. ५०० ग्रॅम


प्रश्न ५) ८५०० ग्रॅम – ६ कि.ग्रॅ. २५० ग्रॅम = ?

१) २२५० ग्रॅम

२) २ कि.ग्रॅ. २५० ग्रॅम

३) २६०० ग्रॅम

४) २ कि.ग्रॅ. ६०० ग्रॅम


प्रश्न ६) १ कि.ग्रॅ. ५०० ग्रॅम × २ = ?

१) २५०० ग्रॅम

२) २ कि.ग्रॅ. ५०० ग्रॅम

३) ३ कि.ग्रॅ.

४) ३००० ग्रॅम


प्रश्न ७) ४५०० ग्रॅम ÷ ३ = ?

१) १ कि.ग्रॅ. ५०० ग्रॅम

२) १५०० ग्रॅम

३) ४५० ग्रॅम

४) १५ कि.ग्रॅ.


प्रश्न ८) खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

१) ३ कि.ग्रॅ. ७५० ग्रॅम = ३७५० ग्रॅम

२) ६२५० ग्रॅम = ६ कि.ग्रॅ. २५० ग्रॅम

३) ४ कि.ग्रॅ. = ४००० ग्रॅम

४) ८२५० ग्रॅम = ८ कि.ग्रॅ. ५० ग्रॅम


प्रश्न ९) खालीलपैकी अचूक जोडी कोणती आहे?

अ) ६ कि.ग्रॅ. ५०० ग्रॅम = ६५०० ग्रॅम

ब) ४७५० ग्रॅम = ४ कि.ग्रॅ. ७५० ग्रॅम

क) ८२५० ग्रॅम = ८ कि.ग्रॅ. २५० ग्रॅम

१) फक्त अ

२) अ व ब

३) ब व क

४) अ, ब व क


प्रश्न १०) एका डब्यात १५ कि.ग्रॅ. ८०० ग्रॅम साखर होती. त्यातून ७ कि.ग्रॅ. २५० ग्रॅम वापरली. उरलेली साखर किती ?

१) ८ कि.ग्रॅ. ५५० ग्रॅम

२) ८५५० ग्रॅम

३) ८ कि.ग्रॅ. ५०० ग्रॅम

४) ८०५० ग्रॅम

Tuesday, 9 September 2025

गणित - मापन (लांबी)

 

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *गणित - मापन (लांबी)*

****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************



१) २ मी ७५ सेंमी = किती सेंमी ?

१) २०७५ सेंमी

२) २७५ सेंमी

३) २५७ सेंमी

४) ३०७५ सेंमी


२) ४ मी ८ सेंमी = किती सेंमी ?

१) ४०८ सेंमी

२) ४८ सेंमी

३) ४००८ सेंमी

४) ४०८० सेंमी


३) ७२५ सेंमी = किती मी किती सेंमी

१) ७ मी २५ सेंमी

२) ७२ मी ५ सेंमी

३) ७ मी २ सेंमी

४) ७२५ मी


४) ४६ मी = सेंमी

१) ४६० सेंमी

२) ४६०० सेंमी

३) ४६००० सेंमी

४) ४६ सेंमी


५) ९२०० मी = किमी

१) ९ किमी २०० मी

२) ९२ किमी

३) ९२० किमी

४) ९०२ किमी


६) खालीलपैकी योग्य नसलेले पद ओळखा.

१) साडे चार मीटर = ४५० सेंमी

२) साडे सहा मीटर = ६६० सेंमी

३) साडे नऊ मीटर = ९५० सेंमी

४) सव्वा दोन मीटर = २२५ सेंमी


७) ४ किमी ५०० मी = किती मीटर ?

१) ४०५ मी

२) ४०५० मी

३) ४५०० मी

४) ५००४ मी


८) ६००० मी = किमी

१) ६० किमी

२) ६०० किमी

३) ६ किमी

४) ६००० किमी


९) ८ मी ६० सेमी + ५ मी ४५ सेमी = किती ?

१) १३ मी ९५ सेमी

२) १४ मी ५ सेमी

३) १४ मी १५ सेमी

४) १३ मी १०५ सेमी


१०) ९ मीटर दोरीपैकी ३ मी ७५ सेंमी दोरी वापरली तर किती शिल्लक राहील ?

१) ५ मी १५ सेंमी

२) ५ मी २५ सेंमी

३) ६ मी २५ सेंमी

४) ४ मी २५ सेंमी